संजय राऊत काय म्हणाले?
कंगना रणौत हिच्या मागणीनंतर उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी खोचक टीका केली आहे. 'श्रीमतीजी हिमाचल प्रदेशातून निवडून आल्या आहेत. त्यांच्या निवासाची व्यवस्था हिमाचल भवन येथे व्हायला हवी. हिमाचलभवन येथे मुख्यमंत्री महोदयांचा खास कक्ष श्रीमतीजींना मिळत असेल तर काहीच हरकत नाही. महाराष्ट्राचे खासदार त्यांच्या हक्काच्या सदनात सिंगल खोलीत रहात आहेत श्रीमतीजी' असा टीका संजय राऊत यांनी केली.
advertisement
कंगनाची मागणी काय होती?
कंगनाने महाराष्ट्र सदनात राहण्यासाठी साधी रूम नाही तर थेट मुख्यमंत्र्यांचा सूटच हवाय अशी मागणी केली आहे. काही वेळापूर्वीच कंगनाने महाराष्ट्र सदनात येऊन सगळ्या रूमची पाहणी केली होती. मात्र, या सगळ्या रूम राहण्यासाठी छोट्या असल्यानं कंगनाने थेट मुख्यमंत्री सुटचीच मागणी केली.
एवढंच नाही तर त्यानंतर कंगनाने सदनातूनच महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याला फोन केल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे. पण कंगनाची या मागणीला नकार मिळाला आहे. तिला राहण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा सूट दिला जाणार नसल्याचं स्पष्टीकरण महाराष्ट्र सदनानं दिलं आहे. तर महाराष्ट्र सदनात राहण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा सूट न मिळाल्यानं कंगना आता इथं राहण्याचा निर्णय बदलण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
वाचा - तुतारीला पिपाणीची धास्ती; विधानसभा निवडणुकीआधी शरद पवारांनी टाकला नवा डाव!
कंगना राणौतने मंडी मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. अभिनेत्रीने या जागेवरून विक्रमादित्य यांचा 74 हजार 755 मतांनी पराभव करत दणदणीत विजय मिळवला. कंगनाने बॉलिवूड नंतर आता राजकारणातही पदार्पण करत खळबळ उडवून दिली. या विजयानंतर कंगना दिल्लीला रवाना झाली तेव्हा ती थप्पड कांडाची शिकार झाली. विमानतळावर सुरक्षा तपासणीदरम्यान एका सीआयएसएफ महिलेने तिच्या कानाखाली मारली. त्यानंतर या महिलेला निलंबित करण्यात आलं. या घटनेवर बॉलिवूडमधूनही अनेक प्रतिक्रिया समोर आल्या. काहींनी कंगनाची बाजू घेतली तर काहींनी त्या महिलेच्या बाजूने वक्तव्य केलं. आता आज कंगनाने खासदारकीची शपथ घेतली आहे. ती कसं काम करणार याकडे चाहत्यांचं लक्ष आहे.