TRENDING:

Sanjay Raut : अजित पवारांचा मृत्यू नैसर्गिक नाही तर रहस्यमयी? संजय राऊतांनी सांगितली अपघातापूर्वीच्या 10 दिवसांची क्रोनोलॉजी!

Last Updated:

Sanjay Raut dubious On Ajit Pawar death : धमकीला अजित पवार यांनी चोख प्रत्युत्तरही दिलं होते, परंतु या प्रसंगानंतर अवघ्या 10 दिवसांतच त्यांचा रहस्यमयरीत्या मृत्यू झाला. ही बाब अनेक शंकांना वाव देणारी असल्याचे राऊत म्हणाले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Sanjay Raut On Ajit Pawar Death : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. अजित पवारांच्या मृत्यूमागे घातपात होता का? असा सवाल विचारला जात असताना, अजित पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी अत्यंत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. महाराष्ट्रातील एका इतक्या मोठ्या उंचीच्या नेत्याचा विमान अपघातात (Ajit Pawar Plane crash) मृत्यू होणं आणि त्यानंतर समोर येत असलेली तथ्ये पाहता, या प्रकरणाची सखोल चौकशी होणं गरजेचं असल्याचं मत राऊत यांनी व्यक्त केलं आहे.
Sanjay Raut dubious On Ajit Pawar death is suspicious Something happen behind
Sanjay Raut dubious On Ajit Pawar death is suspicious Something happen behind
advertisement

काहीतरी संशयास्पद आहे - संजय राऊत

अजित पवार यांच्या अपघातावर प्रश्न नक्कीच उपस्थित केले जातील, प्रश्न विचारलेच पाहिजेत. अजित पवार यांच्यासारख्या महाराष्ट्राच्या एका मोठ्या नेत्याचा ज्या पद्धतीने विमान अपघातात मृत्यू झाला आणि जे तथ्य समोर येत आहेत - त्याची चौकशी झाली पाहिजे, मला वाटतं की यात काहीतरी संशयास्पद आहे, असं संजय राऊत म्हणाले. त्यानंतर त्यांनी मोठे आरोप केले.

advertisement

मृत्यू नैसर्गिक नसून त्यामागे मोठे कारस्थान - संजय राऊत

अजित दादांच्याच पक्षातील लोकांकडून आता हे प्रश्न उपस्थित केले जात आहेत, ही बाब त्यांनी अधोरेखित केली. पडद्यामागे नक्कीच काहीतरी घडले आहे, असा खळबळजनक आरोप करताना त्यांनी म्हटलं की, हा मृत्यू नैसर्गिक नसून त्यामागे मोठे कारस्थान असण्याची दाट शक्यता आहे. या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय.

advertisement

अवघ्या 10 दिवसांतच रहस्यमयरीत्या मृत्यू

राऊत यांनी पुढे एक खळबळजनक खुलासा करताना सांगितलं की, काही दिवसांपूर्वी अजित दादांनी आपण 'स्वगृही' परतण्यास इच्छुक असल्याचे बोलून दाखवले होते. मात्र, त्यानंतर लगेचच भाजपच्या नेत्यांकडून त्यांना जुन्या सिंचन घोटाळ्याच्या (Sinchan Scam) फाईल्स उघडून धमकावण्यात आले होते. या धमकीला अजित पवार यांनी चोख प्रत्युत्तरही दिलं होते, परंतु या प्रसंगानंतर अवघ्या 10 दिवसांतच त्यांचा रहस्यमयरीत्या मृत्यू झाला. ही बाब अनेक शंकांना वाव देणारी असल्याचे राऊत म्हणाले.

advertisement

जस्टिस लोया प्रकरणाची आठवण

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कांद्याच्या दरात घट, सोयाबीन आणि कापसाला आज काय मिळाला भाव? इथं चेक करा
सर्व पहा

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची तुलना संजय राऊत यांनी थेट 'जस्टिस लोया' यांच्या प्रकरणाशी केली आहे. "या सर्व घटनाक्रमावरून आपल्याला काय समजते? हे सर्व पाहून जस्टिस लोया प्रकरणाची आठवण येते," असं खळबळजनक विधान संजय राऊतांनी केलं आहे. कोणीतरी जाणीवपूर्वक हे घडवून आणलं आहे का? असा सवाल त्यांनी विचारला आहे. अजितदादांच्या मृत्यूच्या मागे असलेल्या गुढ सत्याचा शोध घेण्यासाठी विशेष तपास यंत्रणेमार्फत चौकशीची मागणी आता जोर धरू लागली आहे.

मराठी बातम्या/मुंबई/
Sanjay Raut : अजित पवारांचा मृत्यू नैसर्गिक नाही तर रहस्यमयी? संजय राऊतांनी सांगितली अपघातापूर्वीच्या 10 दिवसांची क्रोनोलॉजी!
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल