हत्येचे नेमके कारण काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रेश्मा ढोणे आणि कामता कांबळे या दोघी सांताक्रूझ पश्चिममधील फुलवाली गली परिसरात राहत होत्या. दोघीही घरगुती कामगार म्हणून काम करत होत्या. धक्कादायक म्हणजे या दोघी महिलांमध्ये प्रेमसंबंध होते. मात्र काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू होते.
बुधवारी रात्री सुमारे 11:30 ते 12 वाजण्याच्या दरम्यान रेश्मा ढोणे आरोपीच्या घरी गेली होती. त्या वेळी कामता कांबळेने रेश्माला “तु मला का भेटत नाही?” असा प्रश्न विचारला. यावरून दोघींमध्ये जोरदार वाद झाला. वाद अधिकच वाढत गेला आणि रागाच्या भरात कामता कांबळेने रेश्माच्या छातीत चाकूने वार केल्याचा आरोप आहे.
advertisement
चाकूच्या गंभीर जखमेमुळे रेश्मा ढोणे जागीच कोसळली आणि तिचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सांताक्रूझ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपी कामता कांबळेला ताब्यात घेतले.पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
