TRENDING:

Sanjay Raut : महाराष्ट्राच्या राजकारणात फडणवीसांनी घाण केली, संजय राऊतांची टीका

Last Updated:

शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर फोडाफोडीच्या राजकारणावरून टीका केली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : विधानपरिषद निवडणुकीच्या 11 जागांसाठी मतदान सुरू आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं की, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजकारण पूर्ण बदललेलं आहे. आज लागणार निकाल हा उद्याच्या चार महिन्यात लागणाऱ्या निकाल ठरवणार आहे. आजच्या निकालानंतर कोण कुठे पळून जाते हे तुम्हाला कळेल. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर या इमारतीमधील राजकारण बदलले आहे. महाविकास आघाडीचे तिन्ही उमेदवार निवडून येतील असा विश्वास शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.
News18
News18
advertisement

शिवेसनेतले जुने सहकारी कोणी भेटले का? यावर संजय राऊत म्हणाले की,  मला कोणी जुने सहकारी भेटलेले नाही. आम्ही दिल्लीला मोदींना भेटतो. ते आमचे हात धरतात. आम्ही अनेक वर्ष एकत्र काम केलेलं आहे. त्यांचं आमचं वैयक्तिक भांडण आहे का? असा प्रश्न राऊतांनी विचारला.

आम्हाला बघून प्रत्येकाला मागेच फिरावे लागेल हे तुम्हाला संध्याकाळी दिसेल. मागच्या निवडणुकीनंतर काही लोकांनी येथून पळ काढला होता असं म्हणत संजय राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल गेल्या. 2022मध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आमदारांसह सूरतला गेले होते. त्यानंतर राज्यात राजकीय भूकंप होऊन मविआची सत्ता गेली आणि एकनाथ शिंदे हे भाजपच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री झाले.

advertisement

संजय राऊत म्हणाले की, आमचे तिन्ही उमेदवार हे व्यवस्थित निवडून येतील. कोण पडेल हे मी सांगू शकत नाही. मी इथे सर्वांना भेटलो. अमित शहा सुद्धा आम्हाला भेटतात. मला अजित पवार, शेकापचे जयंत पाटील भेटले, चंद्रकांत पाटील भेटले.

दरम्यान, विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या मतदानावरून सध्या वाद निर्माण झाला आहे. तुरुंगातून न्यायालयाच्या परवानगीने गणपत गायकवाड हे मतदानासाठी आले. मात्र अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही. त्यावरून संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्राच्या राजकारणात घाण देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. अनिल देशमुख, नवाब मलिक यांना मतदानाचा अधिकार दिला नाही. तोच अधिकार गणपत गायकवाड यांना दिला. याबाबत निवडणूक आयोगात जे गेले आहेत ते योग्य आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Sanjay Raut : महाराष्ट्राच्या राजकारणात फडणवीसांनी घाण केली, संजय राऊतांची टीका
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल