पाढे न येणे पडले महागात
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित विद्यार्थिनी गेली सहा वर्षे त्या शिकवणीला जात आहे. दोन दिवसांपूर्वी शिक्षिकेने सर्व विद्यार्थ्यांना पाढे पाठ करून येण्यास सांगितले होते. मात्र काही विद्यार्थ्यांचे पाढे पूर्णपणे पाठ झाले नव्हते. याच कारणावरून शिक्षिकेने विद्यार्थिनीला शिक्षा दिली.
उलथण्याने मारल्याचा आरोप
आरोप आहे की, शिक्षिकेने तिला उलथण्याने मारहाण केली. या प्रकारानंतर विद्यार्थिनी घाबरलेली होती. घरी जाऊन तिने आईला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर विद्यार्थिनीच्या आईने रबाळे पोलिस ठाणे येथे शिक्षिकेविरोधात तक्रार दाखल केली.
advertisement
या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. लहान मुलांवर अशा प्रकारे हात उचलणे चुकीचे असल्याची भावना पालकांनी व्यक्त केली आहे. पोलिसांनी तक्रार नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 19, 2026 9:19 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Shocking : पाढे पाठ नसल्याने केलं भयंकर कांड; शिक्षिका किचनमध्ये गेली अन्...;नवी मुंबईतील घटनेने महाराष्ट्र हादरला
