योगा प्रशिक्षकाकडे जाणं ठरलं चुकिचं
या घटनेतील पीडित मुलगी काळाचौकी परिसरात राहणाऱ्या एका 45 वर्षीय सुतार काम करणाऱ्या व्यक्तीची आहे. पीडिता नियमितपणे जवळच असलेल्या आरोपी शिक्षकाकडे योग प्रशिक्षणासाठी जात होती. 26 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता ती नेहमीप्रमाणे गेली होती. मात्र, आरोपीने तिच्या एकटेपणाचा फायदा घेतला. त्याने मुलीशी जवळीक साधून तिच्यासोबत अश्लील वर्तन केले आणि नंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
advertisement
हा प्रकार कोणाकडेही सांगू नये अशी धमकी देऊन आरोपीने मुलीला सोडले. घरी परतल्यानंतर घाबरलेल्या मुलीने लगेच घडलेला प्रकार तिच्या वडिलांना सांगितला. मुलीचे म्हणणे ऐकून वडिलांनी तातडीने तिला घेऊन काळाचौकी पोलीस ठाणे गाठले आणि आरोपी योगा शिक्षकाविरुद्ध तक्रार दाखल केली.
वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी शिक्षकाविरोधात लैंगिक अत्याचारासह पोस्को कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा नोंदवला. गुन्हा दाखल झाल्यानंतर लगेचच बुधवारी 30 डिसेंबर रोजी पोलिसांनी आरोपीला अटक केली. अटकेनंतर दुसऱ्याच दिवशी त्याला विशेष सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने या गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेऊन आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे.
