घनिष्ठ मैत्रीचा भयानक शेवट
फिर्यादी आणि आरोपी यांची ओळख चांगली असून फिर्यादींचा मुलगा आणि संशयित आरोपी हे दोघेही मित्र आहेत. याच मैत्रीचा गैरफायदा घेत आरोपीने घरात चोरी केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. फिर्यादींच्या घरात कोणालाही संशय येऊ नये यासाठी आरोपीने अगदी सावधपणे कपाट उघडून त्यातील रोकड लंपास केली.
चोरी झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी यांनी तात्काळ संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू करत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले तसेच संशयितांबाबत माहिती गोळा केली. तपासादरम्यान किरण गुरव याच्यावर संशय बळावला. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून गुरुवारी पहाटे किरण गुरव याला अटक केली.
advertisement
या प्रकरणात अजून एक आरोपी असून तो अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अल्पवयीन आरोपीविरोधात बाल न्याय कायद्यानुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे. अटक करण्यात आलेल्या किरण गुरवकडून चोरीतील काही रक्कम जप्त करण्यात आल्याचेही पोलिसांनी सांगितले. सध्या या चोरीप्रकरणाचा पुढील तपास सुरू असून उर्वरित रक्कम कुठे नेण्यात आली याचा शोध पोलीस घेत आहेत.
