तेजस्विनी कोल्हापूरे यांनी 'फ्री प्रेस जर्नल' वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत राहुल आणि श्रद्धाच्या लव्हस्टोरीबद्दल सांगितले की, "खरं सांगायचं तर, मला याबद्दल काहीच माहिती नाही. मला काहीच कल्पना नाही." श्रद्धा फिल्म इंडस्ट्रीमध्ये तिच्या कौटुंबिक वारसाने आलेली आहे. कौटुंबिक वारसा पुढे नेण्याबद्दल तेजस्विनी म्हणाल्या की, "नक्कीच, ही एक खूप छान भावना आहे. मला वाटतं की, प्रत्येकाने यात भर घातली आहे. पद्मिनी कोल्हापुरे या पहिल्या होत्या. पद्मिनीला मिळालेल्या स्टारडमचा काळ फार वेगळा होता. त्याची तुलना सध्याच्या काळाशी करता येणार नाही आणि श्रद्धा आता इंडस्ट्रीमध्ये आहे. श्रद्धाने अभिनयाचा वारसा पुढे नेला आहे. ज्या प्रकारे श्रद्धाने कोल्हापूरे घराण्याचं नाव मोठं केलंय, त्यासाठी आम्ही खूप आनंदी आहोत."
advertisement
श्रद्धा आणि राहुल मोदी यांच्या लग्नाची चर्चा कायमच सोशल मीडियावर सुरू होते. पण त्या दोघांनीही केव्हाही त्यांच्या रिलेशनच्या चर्चांना अधिकृतपणे दुजोरा दिलेला नाही. नुकतेच, अभिनेत्री चाहत्यांसोबत संवाद साधत असताना एका फॅन्सने विचारले की, “तू लग्न केव्हा करणार आहेस?” श्रद्धाच्या इन्स्टाग्रामवर फॅन्सला दिलेल्या उत्तराने सर्वांचेच लक्ष वेधलेय. अलीकडेच, श्रद्धा कपूरने दागिन्यांबद्दल एक प्रमोशनल व्हिडिओ पोस्ट केला होता. तो व्हिडिओ तिने पोस्ट करताच काही वेळातच इन्स्टावर तिच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगली. त्या पोस्टच्या कमेंटमध्ये श्रद्धाला एका चाहत्याने विचारले की, 'लग्न केव्हा करणार आहेस?' त्यावर अभिनेत्रीने उत्तर दिले, “मी करेल किंवा नाही करणार” अभिनेत्रीचं हे उत्तर काही वेळातच व्हायरल झाले.
श्रद्धा आणि राहुल यांनी एकमेकांना 2024 पासून डेटिंगला सुरूवात केल्याची चर्चा आहे. त्यांना अनेकदा कॅज्युअल आऊटिंग आणि डिनर डेट्ससाठी सुद्धा एकत्र स्पॉट झालेले आहेत. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री- वेडिंगला, लग्नावेळीही आणि काही कार्यक्रमांनाही ते एकत्र स्पॉट झाले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी श्रद्धाने इन्स्टाग्रामवर तिचा एक व्हिडिओ शेअर केलेला. यामध्ये राहुल मोदीची झलक दिसलेली. त्यामुळे श्रद्धा आणि राहुलच्या अफेअरच्या चर्चांना हवा मिळाली होती.
