प्रकरण दाबण्याचा प्रयत्न?
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील लोकमान्य टिळक म्यूनसिपल रुग्णालय (सायन रुग्णालय) परिसरात शुक्रवारी रात्री हा अपघात घडला. अपघातात रूग्णाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. फॅारेन्सिक विभागात काम करणाऱ्या या डॅाक्टरवर हॅास्पिटलच्या डिनने कारवाई ऐवजी संपुर्ण प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. शुक्रवारी हॅास्पिटलच्या आवारात रस्त्यावर पडलेल्या रूग्णाला गाडी पार्किंगमधुन बाहेर काढताना डॅाक्टराच्या गाडीने चिरडले. रूग्णांची बॅाडी शवविच्छेदनासाठी जे जे रूग्णालयात पाठवण्यात आली आहे.
advertisement
प्राप्त माहितीनुसार, रुबेदा शेख (वय 60, रा. मुंब्रा कौसा) यांच्यावर सायन रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली. 16 तारखेला त्यांना घरी सोडण्यात आले होते. त्यानंतर शुक्रवारी पुन्हा त्या ड्रेसिंग करण्यासाठी रुग्णालयात आल्या होत्या. ड्रेसिंग करून रुग्णालयाच्या गेट क्रमांक 7 नजीकच्या परिसरात त्या झोपल्या होत्या. संध्याकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास डॉ. डेरे यांची गाडी तेथून जात असताना जुबेदा यांच्या अंगावर चढली. हा प्रकार कळताच जुबेदा यांना तत्काळ अपघात विभागात नेण्यात आले; पण त्या बेशुद्ध पडल्याने त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच रुबेदा यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला. शनिवारी दुपारी या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सायन पोलिसांनी गाडी चालक डॉ. डेरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
