advertisement

धक्कादायक! पुण्यातील आणखी एका पबमधून अल्पवयीन मुलांना दारूचा पुरवठा; राज्य उत्पादन शुल्क विभागाचा छापा

Last Updated:

पुण्यातील आणखी एका पबवर छापा टाकण्यात आला आहे, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

News18
News18
पुणे, चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी :  एका पोर्शे कारनं दुचाकीवर असणाऱ्या तरुण, तरुणीला चिरडल्याची घटना घडली होती. हा अपघात गेल्या रविवारी पुण्यातील कल्याणीनगर भागात घडला होता. ही गाडी एक अल्पवयीन मुलगा चालवत होता. अपघात झाल्यानंतर त्याला लगेचच जामीन मिळाल्यानं पुणेकरांमधून संताप व्यक्त करण्यात येत होता. त्यानंतर आरोपीचा जामीन रद्द करत त्याची रवानगी बालसुधार गृहात करण्यात आली.
दरम्यान अपघातापूर्वी हा अल्पवयीनं आरोपी पबमध्ये जाऊन दारू पिल्याचं समोर आलं, त्यानंतर अल्पवयीन मुलाला दारू कशी काय देण्यात आली असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. त्यानंतर आता पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग अ‍ॅक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे. पुण्यातील आणखी एका पबवर राज्य उत्पादन शुल्क विभागानं छापा टाकला आहे.
advertisement
पुण्यातील 'बॉलर' पबवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून धडक कारवाई करण्यात आली आहे. शनिवारी रात्री उशिरा राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. पार्टी सुरू असतानाच उत्पादन शुक्ल विभागानं पबवर छापा टाकला. रजिस्टर मेंटेन न करणे, प्रिमायसेसच्या बाहेर दारू विक्री करणे, अल्पवयीन मुलांना दारू विक्री करणे, अशी अनेक कारण दाखवत या पब वर कारवाई करण्यात आली आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
धक्कादायक! पुण्यातील आणखी एका पबमधून अल्पवयीन मुलांना दारूचा पुरवठा; राज्य उत्पादन शुल्क विभागाचा छापा
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement