advertisement

१५ मार्चपर्यंत युद्ध थांबलं नाहीतर हापूस आंबा निर्यातीला बसणार फटका! किती नुकसान होणार? माहिती आली समोर

Last Updated:

Hapus Niryat : ध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता भारताच्या कृषी निर्यातीवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

agriculture news
agriculture news
मुंबई : मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता भारताच्या कृषी निर्यातीवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.इस्राइल आणि अमेरिका यांच्या समर्थनासह सुरू असलेल्या संघर्षात इराण सहभागी झाल्यामुळे आखाती प्रदेशात तणाव वाढला आहे. या परिस्थितीचा थेट परिणाम कोकणातील आंबा निर्यातीवर होऊ शकतो. १५ मार्चपूर्वी परिस्थिती सुरळीत झाली नाही, तर हापूस आंब्यासह इतर आंब्यांच्या निर्यातीला मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे. महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकाळ यांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे.
१५ मार्चपासून सुरू होते निर्यात हंगाम
कोकणातून दरवर्षी १५ ते २० मार्चदरम्यान आंबा निर्यातीला सुरुवात होते. विशेषतः Alphonso mango अर्थात हापूस आंब्याची जगभरात मोठी मागणी आहे. भारतातून होणाऱ्या एकूण आंबा निर्यातीत महाराष्ट्राचा वाटा सुमारे ६० ते ७० टक्के आहे. यामध्ये कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्यांचे मोठे योगदान आहे.
या तीन जिल्ह्यांतून दरवर्षी सुमारे १ लाख ७० हजार मेट्रिक टन हापूस आंब्याचे उत्पादन होते. त्यापैकी अंदाजे २० ते २५ हजार मेट्रिक टन आंबा थेट परदेशात निर्यात केला जातो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील परिस्थितीचा या उत्पादनावर मोठा परिणाम होतो.
advertisement
आखाती देश मोठी बाजारपेठ
कोकणातील हापूस आंब्यासाठी यूएई ही सर्वात मोठी बाजारपेठ मानली जाते. याशिवाय अमेरिका, जपान, साऊथ कोरिया तसेच अनेक युरोपीय देशांत कोकणातील आंबा निर्यात केला जातो. या सर्व बाजारपेठांमध्ये हापूस आंब्याला मोठी मागणी असते. मात्र आखाती प्रदेशातील युद्ध परिस्थितीमुळे लॉजिस्टिक्स, विमान वाहतूक आणि व्यापारावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
यंदा उत्पादनात मोठी घट
यंदा हवामानातील बदलाचाही आंबा उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. कृषी विभाग आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ यांच्या संयुक्त पाहणीतून धक्कादायक निष्कर्ष समोर आला आहे. आंब्याच्या बागांमध्ये नर मोहोरांचे प्रमाण वाढणे आणि मोहोर करपणे यामुळे यंदा हापूस आंब्याच्या उत्पादनात सुमारे ८० टक्क्यांची घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
advertisement
प्रक्रिया उद्योगावरही परिणाम
ताज्या आंब्याबरोबरच कोकणातून मोठ्या प्रमाणात मँगो पल्प किंवा आमरसाचीही निर्यात केली जाते. कोकणातील एकूण हापूस उत्पादनापैकी सुमारे २५ ते ३० टक्के आंबा प्रक्रिया उद्योगाकडे जातो. यातील सुमारे ८५ टक्के मँगो पल्प युरोपीय देशांत निर्यात केला जातो. त्यामुळे युद्ध परिस्थिती दीर्घकाळ टिकल्यास ताज्या आंब्याबरोबरच प्रक्रिया उद्योगालाही फटका बसू शकतो.
advertisement
निर्यातीमुळे मिळते मोठे परकीय चलन
केंद्र सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयांतर्गत कार्यरत असलेल्या Agricultural and Processed Food Products Export Development Authority च्या अहवालानुसार २०२४–२५ हंगामात भारतातून सुमारे ३५ हजार मेट्रिक टन ताजा आंबा निर्यात करण्यात आला. या निर्यातीचे एकूण मूल्य जवळपास ६०० कोटी रुपये होते. या निर्यातीमध्ये महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे.
advertisement
हापूसला जीआय टॅगचा फायदा
कोकणातील हापूस आंबा हा जगातील सर्वात महागड्या आणि दर्जेदार आंब्यांपैकी एक मानला जातो. या आंब्याला भौगोलिक मानांकन अर्थात GI टॅग मिळाल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याची विश्वासार्हता वाढली आहे. त्यामुळे इतर आंबा वाणांच्या तुलनेत हापूस आंब्याला अधिक दर मिळतो.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
१५ मार्चपर्यंत युद्ध थांबलं नाहीतर हापूस आंबा निर्यातीला बसणार फटका! किती नुकसान होणार? माहिती आली समोर
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement