TRENDING:

Mumbai: 'साप असेल तू...',मुंबईकर लोकल प्रवाशाने शेपटी पकडली अन् पिशवीत भरला! दादर स्टेशनवरचा VIDEO व्हायरल

Last Updated:

दादर रेल्वे स्टेशनचा परिसर हा नेहमी गर्दीने गजबजलेला असतो. स्टेशनवर खाली उतरल्यावर पाय ठेवायला सुद्धा जागा नसते. पण, या गर्दीमध्ये आज एका सापाने एंट्री केली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सुमित सावंत, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

मुंबई :  मुंबईमधील सेंटर हार्ट ठिकाण समजलं जाणाऱ्या दादरमध्ये एक आश्चर्यकारक घटना घडली आहे. दादर रेल्वे स्टेशनचा परिसर हा नेहमी गर्दीने गजबजलेला असतो. स्टेशनवर खाली उतरल्यावर पाय ठेवायला सुद्धा जागा नसते. पण, या गर्दीमध्ये आज एका सापाने एंट्री केली. त्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. पण, या सापाला एका प्रवाशाने धाडस दाखवून पकडून दिलं.  या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

advertisement

त्याचं झालं असं की, दादर रेल्वे स्थानकाबाहेर पश्चिम भागामध्ये फेरीवाले आणि भाजीपाला विक्रेत्यांची कायम गर्दी असते. अधून मधून पालिका फेरीवाल्यांवर कारवाई करते, त्यामुळे फेरीवाले हे काही काळ पळ काढतात. पण, याच काळात दादरचे रस्ते मोकळे होतात. आज शनिवारी पालिकेच्या कर्मचारी दादर रेल्वे स्टेशनच्या परिसरात ठाण मांडून होते. त्यामुळे फेरिवाल्यांची गर्दी कमी होती.

advertisement

पण, याच वेळी संध्याकाळच्या सुमारास एका सापाने या परिसरात एंट्री केली. उड्डाणपुलाजवळ हा साप अचानक रस्त्यावर आला. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली. आधीच संध्याकाळचा वेळ आणि त्यात लोकांची गर्दी, त्यात सापाने एंट्री केल्यामुळे एकच गोंधळ उडाला.

advertisement

लोकांनी साप साप म्हणून एकच बोंब ठोकली. त्यामुळे या सापापासून लोक लांब पळाली. पण काही महाभाग या सापाच्या मागे लागले. मोबाईलवर व्हिडिओ रेकॉर्ड करत या सापाच्या मागे मागे येत होते. त्यामुळे साप बिथरला आणि उड्डाणपुलाच्या खाली आला. त्यावेळी रेल्वे स्थानकावर तैनात असलेल्या रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

तो पुढे आला आणि सापाची शेपटी पकडली

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
एक दिवस कधी चुकला नाही! गरिब रुग्णांसाठी 15 वर्षांपासून घाटी रुग्णालयात मोफत जेवण, जैन अलर्टचा उपक्रम
सर्व पहा

पण, आता सापाला कोण पकडणार असा प्रश्न उपस्थितीत झाला. त्यावेळी काही प्रवाशी धाडस करून पुढे आले, एकाने प्लास्टिकची पिशवी पकडली आणि तर कुणी पांढरा कापड घेऊन सापाला पकडण्याचा प्रयत्न केला. पण, साप काही पिशवीमध्ये शिरण्यास तयार नव्हता. या गर्दीमध्ये एक प्रवाशी तिथेच उभा होता, तो पुढे आला आणि सापाची शेपटी पकडली आणि पिशवीमध्ये टाकलं. जसं सापाला पिशवीमध्ये टाकलं तसं लोक 'पिशवी बंद करून टाका' असं म्हणत ओरडायला लागले. काही जणांनी या प्रवाशांच्या धाडस पाहून टाळ्या सुद्धा वाजवल्या. पण, या सापाच्या दादरसारख्या परिसरात एंट्रीमुळे काही काळ स्टेशन परिसरात गोंधळ उडाला होता.

मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai: 'साप असेल तू...',मुंबईकर लोकल प्रवाशाने शेपटी पकडली अन् पिशवीत भरला! दादर स्टेशनवरचा VIDEO व्हायरल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल