मुंबई : पुरुषांच्या कॅज्युअल कपड्यांमध्ये शॉर्ट कुर्ता हा एक सध्याचा लोकप्रिय ट्रेंड आहे. शॉर्ट कुर्त्यांचे वैशिष्ट्य असे आहे की, ते एकाचवेळी कॅज्यूअल तसेच फेस्टीव्ह लूकही देते. त्यामुळे असे स्टायलिश आणि जरा हटके लूक दिसणारे शॉर्ट कुर्ते हे मुंबईतील अंधेरी मार्केटमध्ये फक्त 500 रुपयांपासून मिळत आहेत.
जेव्हा पुरुषांच्या कपड्यांचा विचार केला जातो तेव्हा फ्लोरल प्रिंट्स आणि पेस्टल रंगछटा फार चर्चेत असतात. अशाप्रकारे, जर तुम्ही आकर्षक कुर्ता शोधत असाल तर ते अंधेरी मार्केटमध्ये 500 रुपयांपासून उपलब्ध आहे. यामध्ये वेगवेगळे कलेक्शनही पाहायला मिळते. प्रत्येक कुर्त्याची खासियत ही वेगवेगळी आहे.
advertisement
जसे की, कॉटन कुर्त्यामध्ये स्टाईल आणि मिनिमलिझमचे अतुलनिय मिश्रण आहे. हा एक ट्रेंडसेटिंग शॉर्ट कुर्ता आहे. यामध्येही बरेच डार्क आणि लाईट कलर मिळतात. याची किंमत ही 500 रुपये आहे. तसेच फॅन्सी पेस्टल्स पिंक हँडक्राफ्टेड कॉटन कुर्ता, जे पारंपारिक कुर्त्याचे अपग्रेडेड व्हर्जन आहे. यामध्ये वेगवेगळे डिजिटल प्रिंटिंग नुसार या कुर्त्याना जरा वेगळाच लूक येतो. त्यामुळे फेस्टिवल सीझनमध्ये हा कुर्ते परिधान केल्यास तो हटके लूक देवून जातो. याची किंमतही 600 रुपये आहे.
फुले, फळे, पालेभाज्यांच्या बियापासून राख्या, साताऱ्यात महिला कैदींचा अनोखा उपक्रम, VIDEO
प्युअर चिकनकारी कॉटन शॉर्ट कुर्ता यामध्ये लाईट कलरचे रंग जास्त आहेत. यामध्ये अगदी वर्किंग रेखीव केले आहे. हा कुर्ता ऑल टाइम फेव्हरेट असू शकतो. कारण, हा डेनिम जीन्ससह अधिक चांगला दिसतो. प्रत्येक लूक उठून दिसतो. याची किंमतही 500 रुपयांपासून आहे.
नाशिकमधील 5 बेस्ट धबधबे, कुटुंबासह जाऊन घेऊ शकता आनंद, नयनरम्य असं दृश्य, PHOTOS
प्रिंटेड सुपर शॉर्ट कुर्ता पुरुषांसाठी हा सर्वोत्तम शॉर्ट कुर्तांपैकी एक आहे. याच्या मँडरीन कॉलरपासून ते आकर्षक ट्रायबल प्रिंटपर्यंत सर्व काही या कुर्त्यावर आहे. हा फारच कम्फर्टेबल आहे आणि याची किंमत ही 600 रुपयांना आहे. त्यामुळे बजेट फ्रेंडली दरात सर्वांना परवडणाऱ्या अशा बऱ्याच कुर्त्यांचे कलेक्शन येथे पाहायला मिळते.