फुले, फळे, पालेभाज्यांच्या बियापासून राख्या, साताऱ्यात महिला कैदींचा अनोखा उपक्रम, VIDEO
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Shubham Sharad Bodake
Last Updated:
सातारा कारागृहातील महिला कैदींनी वेगवेगळ्या फळांच्या, फुलांच्या, पालेभाज्यांच्या बियांपासून आपल्या हाताने या राख्या तयार केल्या आहेत. या राखीची किंमत बाकी राख्यांच्या किमती एवढीच आहे.
शुभम बोडके, प्रतिनिधी
सातारा : रक्षाबंधन हा बहीण भावाच्या अतूट नात्याची साक्ष देणारा पवित्र सण आहे. याच दिवशी बहिण भावाच्या हाताला राखी बांधून त्यांच्या दीर्घायुष्याची कामना करतात. या सणाला बाजारात अनेक आकर्षक राख्या विक्रीसाठी दाखल होत असतात. याच रक्षाबंधन सणानिमित्त सातारा कारागृहातील महिला कैद्यांच्या आकर्षक आणि रंगबिरंगी अशा वेगवेगळ्या फुलांच्या, फळांच्या बियांपासून राख्या तयार करण्यात आल्या आहेत. कारागृहातील महिला कैदींनी तयार केलेल्या अनोख्या राख्यांबद्दलची सविस्तर माहिती कारागृह अधीक्षक शमाकांत शेडगे यांनी लोकल18 शी बोलताना दिली.
advertisement
या राख्यांचे वेगळंपण काय -
सातारा कारागृहातील महिला कैदींनी वेगवेगळ्या फळांच्या, फुलांच्या, पालेभाज्यांच्या बियांपासून आपल्या हाताने या राख्या तयार केल्या आहेत. या राखीची किंमत बाकी राख्यांच्या किमती एवढीच आहे. 15 रुपयांपासून ते 35 रुपयांपर्यंत या फळांच्या, फुलांच्या आणि पालेभाज्यांच्या राख्यांची किंमत ठेवण्यात आली आहे. या वेगळ्या आणि अनोख्या अशा उपक्रमाच्या माध्यमातून कारागृहात असलेल्या महिलांना एक वेगळा आर्थिक स्त्रोत निर्माण झाला आहे.
advertisement
या राख्या काही दिवसानंतर पडून किंवा सुटून जातात, त्या जिथे पडतील तिथे एक वृक्ष किंवा झाड लागेल, या हेतूने अशाप्रकारच्या राखी तयार करण्याचे नियोजन करण्यात आले होते, असे सातारा जिल्हा कारागृह अधीक्षक शामाकांत शेडगे यांनी सांगितले.
‘गावाचं आपण देणं लागतो’, याच विचारातून डॉक्टर तरुणाने घेतला कौतुकास्पद निर्णय, धाराशिवमधील कहाणी
सातारा कारागृहातील महिला बंद्यांच्या हाताला काम मिळावे, या उदात्त हेतूने आणि विचाराने पुणे विभागाच्या कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांच्या संकल्पनेतून आणि माणदेशी फाउंडेशनच्या अध्यक्षा चेतना सिन्हा यांच्या सहकार्याने सातारा कारागृहातील महिला कैदींनी सुबक व आकर्षक राखी तयार केल्या आहेत. या आकर्षक राख्या महिलांनी खरेदी करावे, असे आवाहन कारागृह अधीक्षक शामकांत शेडगे यांनी केले आहे.
advertisement
यामध्ये माणदेशी फाउंडेशन, शाखा सातारा येथील प्रोग्रॅम डायरेक्टर अपर्णा सावंत यांच्या योजनेअंतर्गत महिला कैदींना रक्षाबंधनाचे औचित्य साधून राखी प्रशिक्षण देण्यात आले. हे प्रशिक्षण ट्रेनर जया काळे, धनश्री पवार यांनी दिले. यामध्ये कारागृहातील सर्व महिला कैदींनी 200 हून अधिक आकर्षक व सुबक राख्या तयार केल्या आहेत.
advertisement
सदर राखी तयार करण्याच्या प्रशिक्षण कार्यक्रमावेळेस अपर्णा सावंत, ट्रेनर जया काळे, धनश्री पवार, वरिष्ठ तुरुंगाधिकारी ज्ञानेश्वर दुबे, राजेंद्र भापकर, महिला शिपाई गीता दाभाडे, जयश्री पवार, मीनाक्षी जाधव, माधुरी वायकर, ज्योती शिंगरे, रूपाली नलावडे, अंकिता करपे, प्रतीक्षा मोरे हजर होते.
advertisement
Location :
Satara,Maharashtra
First Published :
August 16, 2024 2:09 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सातारा/
फुले, फळे, पालेभाज्यांच्या बियापासून राख्या, साताऱ्यात महिला कैदींचा अनोखा उपक्रम, VIDEO