'गावाचं आपण देणं लागतो', याच विचारातून डॉक्टर तरुणाने घेतला कौतुकास्पद निर्णय, धाराशिवमधील कहाणी
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Abasaheb Dharmraj Sabale
Last Updated:
डॉ. राहुल घुले यांनी सर्वसामान्य लोकांसाठी महाराष्ट्र, उत्तरप्रदेश या ठिकाणी 38 वन रुपी क्लिनिक सुरू केले आहेत.
उदय साबळे, प्रतिनिधी
धाराशिव : ज्या गावात जन्म झाला, प्राथमिक शिक्षण झाले, त्याच गावाकडे लोकांच्या सुविधेसाठी एका व्यक्तीने वन रुपी क्लिनिक सुरू केले आहे. डॉ. राहुल घुले असे या व्यक्तीचे नाव आहे. नेमकी काय आहे यामागची संकल्पना, याचबाबत लोकल18 च्या टीमने घेतलेला हा आढावा.
डॉ. राहुल घुले यांनी सर्वसामान्य लोकांसाठी महाराष्ट्र, उत्तरप्रदेश या ठिकाणी 38 वन रुपी क्लिनिक सुरू केले आहेत. या वन रुपी क्लिनिकच्या माध्यमातून गेल्या 7 वर्षात साडेसहा लाख लोकांच्या आरोग्याची त्यांनी तपासणी केली आहे. तसेच कित्येक ऑपरेशन मोफत केली आहेत. आणि हेच वन रुपी क्लिनिक गेल्या वर्षभरापासून भूम आणि परंडा या ठिकाणी सुरू करण्यात आले आहे.
advertisement
सध्या देशात 38 ठिकाणी त्यांचे वन रुपी क्लिनिक सुरू आहे. या क्लिनिकच्या माध्यमातून आरोग्य तपासणी, चष्मे, वयोवृद्धांना काठ्या वाटप, आरोग्य शिबिरे, मोफत गोळ्या औषधांचे वाटप, खतना शिबीर, आदी उपक्रम राबवत आहेत. इतकेच नाही तर ज्या ग्रामीण भागातून ते आले, त्या ग्रामीण भागात लोकांच्या आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी आरोग्यमित्र म्हणून ते काम करीत आहेत.
advertisement
ladki bahin yojana : खात्यावर पैसे येताच लाडक्या बहिणींनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली, छत्रपती संभाजीनगरमधील VIDEO
शेतकरी बांधवांसाठी मोफत डीपी वाहतूक वाहन, लग्न व कार्यक्रमासाठी मोफत मंगल सेवा केंद्र मार्फत भांडे व साहित्यही दिले जाते. डॉ.राहुल घुले यांनी देशातील अनेक ठिकाणी वन रुपी क्लिनिकला सुरुवात केली आहे. लोकल18 शी बोलताना ते म्हणाले की, ज्या गावाकडे माझा जन्म झाला, जिथे प्राथमिक शिक्षण झाले, त्या ठिकाणी लोकांच्या आरोग्याच्या सुविधेसाठी वन रुपी क्लिनिक सुरू केले आहे. तर मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल सुरू करून लोकांना आरोग्य सुविधा देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
Location :
Osmanabad,Maharashtra
First Published :
August 16, 2024 1:07 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/धाराशिव/
'गावाचं आपण देणं लागतो', याच विचारातून डॉक्टर तरुणाने घेतला कौतुकास्पद निर्णय, धाराशिवमधील कहाणी