सर्वोच्च न्यायालयानं राष्ट्रवादी अजित पवार गटाला घड्याळ चिन्ह वापरताना हे चिन्ह न्यायप्रविष्ठ आहे आणि ते सर्वोच्च न्यायालयाच्य सुनावणीच्या आदेशाला बांधील आहे, असे प्रत्येक ठिकाणी लिहिण्याचे आदेश दिले होते. मात्र अजित पवार गटाकडून घड्याळ वापरताना कुठेही डिस्क्लेमर दिलं जात नाही, असा आरोप शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी यावेळी केला.
advertisement
दरम्यान या प्रकरणावर सुनावणी करताना न्यायालयानं राष्ट्रवादी चिन्ह प्रकरणात दोन्ही बाजुंना समज दिली आहे. दोन्ही बाजुंना समज देतानाच अर्ज निकाली काढला आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे काही लोक घड्याळ चिन्ह वापरत असल्याच्या आरोपावर निर्णय देताना शरद पवार गटाला घड्याळ चिन्ह वापरता येणार नाही, असे आदेश न्यायालयानं दिले आहेत. तसेच जितेंद्र आव्हाड यांनी चुकीचं ट्विट करू नये, म्हणत न्यायालयांन त्यांना देखील फटकारलं आहे.
दरम्यान दुसरीकडे अजित पवारांनी मोठ्या जाहिराती द्याव्यात, त्यात चिन्ह निकालापर्यंत असेल असं ठळक लिहिवावं असा आदेशही सुप्रीम कोर्टाकडून देण्यात आला आहे. 19 तारखेच्या आदेशात काहीच बदल केला जाणार नसल्याचंही यावेळी न्यायालयानं म्हटलं आहे.