TRENDING:

अशोक खरात पेक्षा भयंकर, पुजाऱ्यानं 5 वर्षाच्या चिमुकलीलाही सोडलं नाही, डोंबिवली हादरली!

Last Updated:

Dombivli News: डोंबिवलीतील आरोपी हरीश भावे हा घरोघरी जाऊन पूजा-अर्चा करणारा पुजारी आहे. पीडित मुलगी ही शेजारीच राहते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
ठाणे: भोंदूबाबा अशोक खरातवरून महाराष्ट्रातील सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. अशातच आणखी एका भोंदूचं भयंकर कांड समोर आलंय. डोंबिवलीत एका पुजाऱ्यानं 5 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केले. आरोपीविरोधात टिळकनगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या घटनेमुळं डोंबिवलीत संतापाची लाट असून कठोर कारवाईची मागणी होत आहे.
अशोक खरात पेक्षा भयंकर, पुजाऱ्यानं 5 वर्षाच्या चिमुकलीलाही सोडलं नाही, डोंबिवली हादरली!
अशोक खरात पेक्षा भयंकर, पुजाऱ्यानं 5 वर्षाच्या चिमुकलीलाही सोडलं नाही, डोंबिवली हादरली!
advertisement

डोंबिवलीतील आरोपी हरीश भावे हा घरोघरी जाऊन पूजा-अर्चा करणारा पुजारी आहे. पीडित मुलगी ही आरोपीच्या शेजारीच राहते. तिच्या घरी आरोपीचे येणे-जाणे होते. याच ओळखीचा गैरफायदा घेत त्याने घेतला. पीडित मुलीचे आई-वडील कामासाठी बाहेर गेले होते. तेव्हा त्याने चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केला.

मी बिन लग्नाचा! 57 वर्षीय व्यापाऱ्याचं भयंकर कांड, 29 वर्षीय महिलेसोबत..., छ. संभाजीनगरच्या घटनेनं खळबळ

advertisement

पीडित मुलीने आई-वडील घरी आल्यानंतर त्यांना घडलेला प्रकार सांगितला. त्यामुळे ही भयंकर घटना उघडकीस आली. त्यानंतर संतप्त पालकांनी टिळकनगर पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य पाहून आरोपीविरोधात तात्काळ गुन्हा दाखल केला. तसेच त्याला अटक केली.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
उन्हाळ्यात शरीर थंड ठेवणारी बीट कोशिंबीर, कमी वेळेत बनवा पौष्टिक रेसिपी, सोप्या पद्धतीचा Video
सर्व पहा

दरम्यान, गेल्या काही काळापासून महिला व मुलींवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या असून सातत्याने नवीन प्रकरणे पुढे येत आहेत. त्यामुळे नागरिकांत भीती आणि संतापाचे वातावरण आहे. आता धार्मिक कार्य करणाऱ्या व्यक्तींकडूनच फसवणूक होत असल्याने लोकांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. तसेच कठोर कारवाईची मागणी होत आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
अशोक खरात पेक्षा भयंकर, पुजाऱ्यानं 5 वर्षाच्या चिमुकलीलाही सोडलं नाही, डोंबिवली हादरली!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल