24 जुलै 2025 रोजी मुंबई हाय कोर्टाने प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती विसर्जनाबाबत सुधारित व एकत्रित मार्गदर्शक सूचना सरकारला दिल्या होत्या. या सूचना देताना कोर्टाने 2024मधील जनहित याचिका व इतर न्यायालयीन प्रकरणे विचारात घेतली होती. त्यानंतर राज्य सरकारने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना सदर मार्गदर्शक सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यास सांगितली आहे.
चला ग सयांनो मंगळागौर खेळूया, 'अशी' साजरी करा यंदाची मंगळागौर
advertisement
आपापल्या हद्दीतील सार्वजनिक मंडळांनी लहान आकाराच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी यासाठी राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी प्रोत्साहन द्यावे. जर मंडळांनी मोठ्या आकाराच्या मूर्तींची प्रतिष्ठापना केली असेल तर विसर्जनासाठी मोठ्या मूर्तीऐवजी प्रतीकात्मक स्वरुपात लहान मूर्तीचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, अशा सूचना प्रशासनाला मिळाल्या आहेत.
ग्रामपंचायत, नगर परिषद, नगर पालिका, महानगरपालिका यांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपापल्या हद्दीमध्ये पुरेशा कृत्रिम तलावांची निर्मिती करावी जेणेकरून त्यामध्ये सहा फुटांपर्यंत उंचीच्या मूर्तींचे विसर्जन करता येईल, असे आदेश देण्यात आले आहेत. सहा फूट उंचीपेक्षा कमी उंचीच्या सर्व मूर्तींचे विसर्जन हे कृत्रिम तलावांतच होईल याकडे कटाक्षाने लक्ष देण्यास सांगण्यात आले आहे.