TRENDING:

Mumbai News: मुंबईत प्रमुख रेल्वे स्थानकांवर 2 दिवस असणार पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, नेमकं कारण काय?

Last Updated:

पुढच्या आठवड्यांत लागोपाठ दोन महत्त्वाचे सण येत असल्यामुळे मुंबई आणि उपनगरांतील प्रमुख रेल्वे स्थानकांवर पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. रेल्वे स्टेशन परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवला जाणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: पुढच्या आठवड्यामध्ये लागोपाठ दोन महत्त्वाचे सण येत असल्यामुळे मुंबई आणि उपनगरांतील प्रमुख रेल्वे स्थानकांवर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. सणांनिमित्त रेल्वे स्थानक परिसरामध्ये प्रवाशांकडून गर्दी होऊ नये, यासाठी पोलिसांकडून रेल्वे स्थानक परिसरामध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवला जाणार आहे. खरंतर, सणासुदीच्या काळामध्ये अनेक प्रमुख रेल्वे स्थानकांवर पोलिसांचा फौजफाटा कायमच तैनात असतो. धक्काबुक्की सदृश परिस्थिती आणि इतरत्र कोणतीही घटना घडू नये, या दृष्टीने रेल्वे पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे.
News18
News18
advertisement

गुरूवार (19 मार्च 2026) गुढीपाडवा आणि शनिवार (21 मार्च 2026) रमजान ईद असे दोन्हीही सण लागोपाठ येत असल्यामुळे पोलिसांकडून रेल्वे स्टेशनसह इतरत्र ठिकाणीही कडेकोट बंदोबस्त ठेवला जाणार आहे. या बंदोबस्ताच्या काळामध्ये पोलिसांकडून प्रत्येक प्रवाशाची बॅग तपासूनच त्यांना पुढच्या प्रवासासाठी पाठवले जाणार आहे. शिवाय, सध्या आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे गॅस सिलिंडर आणि इंधनाचा तुटवडा निर्माण झाला आहे. युद्धामुळे निर्माण झालेल्या गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे अनेक नागरिक शहरातून आपल्या गावी जाताना दिसत आहेत. त्यामुळे कदाचित चेंगरा चेंगरी, चोरीच्या घटना किंवा महिलांची छेडछाड अशा अनेक घटना घडण्याची शक्यता सर्वाधिक आहे.

advertisement

रेल्वे स्टेशनवरील प्रत्येक ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची प्रवाशांच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवले जाणार आहे. पोलिसांना जर कुठेही काही संशयास्पद आढळून आल्यास पोलिसांकडून सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील रेकॉर्डिंगची तपासणी करण्यात येत असून श्वान पथक, बॉम्ब शोधक आणि निकामी पथकद्वारे नियमित तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे. रेल्वे पोलीस आणि आरपीएफकडून यांच्याकडून स्टेशनवर असणाऱ्या स्टॉलधारकांना, फेरीवाल्यांना, हमालांना, बूट पॉलिशवाल्यांना आणि सफाई कामगारांना सुद्धा सुरक्षेचे धडे दिले जात आहेत. परिसरामध्ये जर कुठेही मारामारी किंवा कोणताही विचित्र प्रकार जर घडला तर तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी. सोबतच पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहनही पोलिसांनी केलेले आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: लिंबू, द्राक्षांनी मार्केट खाल्लं, कांदा अन् केळीला कुठं मिळाला सर्वाधिक भाव?
सर्व पहा

रेल्वे परिसरात काम करत असताना बेवारस बॅग, संशयास्पद वस्तू किंवा संशयास्पद व्यक्ती दिसल्यास त्याची माहिती तत्काळ कर्तव्यावरील रेल्वे पोलीस आणि आरपीएफला द्यावी. तसेच रेल्वेकडे मदतीसाठी 1512 किंवा 139 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले. आरपीएफ आणि रेल्वे पोलीस यांच्याकडून मुंबई आणि उपनगरातील प्रमुख रेल्वे स्टेशन परिसरामध्ये कडेकोट बंदोबस्त दिला जाणार आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai News: मुंबईत प्रमुख रेल्वे स्थानकांवर 2 दिवस असणार पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, नेमकं कारण काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल