सध्या घडलेली एक घटना या गोष्टीची पुन्हा आठवण करुन देतात. वडील आपल्या मुलांसाठी कितीही संकटांना सामोरं जाण्यास तयार असतात हे या घटनेत स्पष्टपणे दिसून आलं आहे. एका वडिलांनी आपल्या लेकराचं जीवण वाचवण्यासाठी जीवाची पर्वा न करता जोखमीचं पाऊल उचललं. त्यांच्या या प्रयत्नामुळे आज महाराष्ट्रभर त्यांची चर्चा रंगली आहे.
कोल्हापुरच्या चिमुकल्याची कहाणी
advertisement
आज आपण पाहत असलेली घटना कोल्हापुर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील एका छोट्या गावातील आहे. या गावातील नऊ वर्षीयाच्या चिमुकल्याच्या आयुष्यात एक वादळ येते. ते म्हणजे काही महिन्यांपूर्वी त्याला सतत ताप, अशक्तपणा आणि भूक मंदावल्याची समस्या जाणवत होती. तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी कर्करोगाचे निदान केले. ही बातमी कुटुंबासाठी हादरवून टाकणारी होती. चिमुकल्याचे वडील एका खासगी फायनान्स कंपनीत काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात, त्यामुळे उपचारासाठी लागणारा प्रचंड खर्च परवडणं अशक्य होतं.
डॉक्टरांनी चिमुकल्याचे प्राण वाचवण्यासाठी बोन मॅरो प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिला. मात्र यासाठी लागणारा खर्च जवळपास 30 लाखांच्या घरात होता. अशा वेळी प्रकाशच्या वडिलांनी स्वतःच्या स्टेम सेल्स दान करण्याचा निर्णय घेतला. मुलासाठी वडिलांनी स्वतःचे जीवन पणाला लावले.
मुंबईतील वाडिया रुग्णालयात चिमुकल्याला दाखल करण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष आणि टाटा ट्रस्ट यांच्या माध्यमातून उपचारासाठी आवश्यक आर्थिक मदत मिळवण्याचे प्रयत्न सुरू झाले. विविध सामाजिक संस्थांनीही पुढाकार घेत आर्थिक सहाय्याचे हात पुढे केले. या सर्वांच्या संयुक्त प्रयत्नांतून तब्बल 29 लाख रुपयांची मदत उभी राहिली.
या निधीच्या सहाय्याने आणि वडिलांच्या स्टेम सेल दानामुळे चिमुकल्यावर यशस्वी बोन मॅरो प्रत्यारोपण करण्यात आले. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून तो बरा होत आहे. एका वडिलांनी आपल्या मुलासाठी केला हा त्याग प्रत्येकासाठी प्रेरणा ठरले आहे.
