TRENDING:

लालपरी आता धूर सोडणार नाही! एसटी महामंडळाचा मोठा निर्णय, 14 हजार बसेस...

Last Updated:

ST Bus: इलेक्ट्रिक वाहन खरेदी करणाऱ्या नागरिकांना सरकारकडून विशेष कर सवलती आणि टोल माफी देण्यात येणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : सध्याच्या काळात वाढते प्रदुषण आणि इंधनाच्या दरांतील अस्थिरता यामुळे पर्यावरणपुरक इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढत आहे. त्यातच सरकारकडून देखील अशा वाहनांना सवलतीच्या योजना जाहीर करण्यात येत आहेत. आता लालपरी देखील धूर सोडणं बंद करणार आहे. येत्या 2035 पर्यंत एसटी महामंडळाच्या ताफ्यातील 14 हजार बसेस पूर्णपणे इलेक्ट्रिक करण्यात येतील, अशी घोषणाच परिवहन मंत्री तथा महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली.
ST Bus: लालपरी आता धूर सोडणार नाही! एसटी महामंडळाचा मोठा निर्णय, 14 हजार बसेस...
ST Bus: लालपरी आता धूर सोडणार नाही! एसटी महामंडळाचा मोठा निर्णय, 14 हजार बसेस...
advertisement

मंत्री प्रताप सरनाईक यांनी नियम 293 अंतर्गत मांडलेल्या प्रस्तावावर विधानसभेत उत्तर दिले. यावेळी वाढते प्रदूषण आणि इंधन दरांतील अस्थिरता पाहता, ग्रामीण महाराष्ट्राची जीवनवाहिनी असणार्या एसटीला हरित ऊर्जेची जोड देण्याची गरज व्यक्त केली. या निर्णयामुळे पर्यावरणाचे रक्षण होणार आहे. तसेच इंधन आणि देखभाल खर्चात देखील मोठी घट होईल आणि एसटीची स्थिती सुधारेल, असे सरनाईक म्हणाले.

advertisement

मुंबई-पुणे प्रवास सुसाट, घाटातील कोंडी सुटणार, ‘मिसिंग लिंक’ची डेडलाईन ठरली, वाहतूक कधी सुरू?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नोकरीच्या पगारात भागत नव्हता खर्च, तरुणाने सुरू केला तेल व्यवसाय, महिन्याला 4 लाखांची उलाढाल
सर्व पहा

दरम्यान, इलेक्ट्रिक वाहन खरेदी करणाऱ्या नागरिकांना सरकारकडून विशेष कर सवलती आणि टोल माफी देण्यात येणार आहे. राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावर दर 25 किलोमीटर अंतरावर चार्जिंग स्टेशन्स उभारली जातील आणि ही चार्जिंग स्टेशन्स सौर ऊर्जेवर चालवण्याला प्राधान्य दिले जाईल, असेही सरनाईक यांनी सांगितले.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
लालपरी आता धूर सोडणार नाही! एसटी महामंडळाचा मोठा निर्णय, 14 हजार बसेस...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल