TRENDING:

Mumbai: ना वादळ ना वारं, अचानक झाडाची फांदी तुटली; एकाच मृत्यू, मुंबईतील घटना

Last Updated:

मुंबईतील कुलाबा भागात झाडाची फांदी तुटून पडली. या दुर्घटनेमध्ये एका इसमाचा मृत्यू झाला आहे. तर काही जण जखमी झाले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सुमित सोनवणे, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

मुंबई: राज्यभरात एकीकडे उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. तर दुसरीकडे अवकाळी पावसानेही हजेरी लावली आहे. अशातच मुंबईतील कुलाबा भागात झाडाची फांदी तुटून पडली. या दुर्घटनेमध्ये एका इसमाचा मृत्यू झाला आहे. तर काही जण जखमी झाले आहे. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील कुलाबा परिसरात पोलीस महासंचालक कार्यालयासमोर एका झाडाची फांदी कोसळण्याची घटना घडली. संध्याकाळी ४ वाजेच्या सुमारासही घटना घडली होती. गुलमोहराच्या झाडाची मोठी फांदी अचानक  तुटून पडली होती. त्यावेळी तिथून जाणाऱ्या वाहनांवर झाडाची फांदी कोसळली. चार वाहनं ही फांदीखाली सापडली होती. या अपघातात काही जण अडकले होते. जखमींना तातडीने सेंट जॉर्ज रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. पण, उपचारादरम्यान जखमी झालेल्या  अनिल भगोजी मोरे (वय ४५) यांचा मृत्यू झाला. आणखी काही जण जखमी झाले आहे, त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबाचे दर घसरले, कांद्याला भाव वाढ नाहीच, केळीची काय स्थिती?
सर्व पहा

घटनेची माहिती मिळताच  मुंबई अग्निशमन दल, पोलीस आणि पालिकेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. झाडाची पडलेली फांदी बाजूला करण्यात आली आहे.  ही घटना नेमकी कशामुळे घडली. याचं कारण अद्याप समोर आलं नाही. या घटनेमुळे परिसरात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. अग्निशमन दलाने कोसळलेल्या झाडाची फांदी बाजूला करून वाहतूक पूर्वपदावर करून दिली.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai: ना वादळ ना वारं, अचानक झाडाची फांदी तुटली; एकाच मृत्यू, मुंबईतील घटना
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल