मिळालेल्या माहितीनुसार, खान कॉम्प्लेक्सच्या आवारात काही लहान मुले खेळत असताना खेळण्यावरून दोन गटातील मुलांमध्ये शाब्दिक वाद झाला. सुरुवातीला किरकोळ स्वरूपाचा असलेला हा वाद काही वेळातच मोठ्यांपर्यंत पोहोचला. दोन्ही गटातील व्यक्ती घटनास्थळी जमा झाल्यानंतर वातावरण तापले आणि एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. याच दरम्यान एका व्यक्तीने अब्दुल रहमान खान यांच्यावर चाकूने हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला.
advertisement
पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल
गंभीर जखमी अवस्थेत अब्दुल रहमान खान यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या माहितीनुसार त्यांच्या पोटावर आणि छातीच्या भागात गंभीर जखमा झाल्या असून प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच वालीव पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणत परिसरात बंदोबस्त वाढवला. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून हल्ल्यात सहभागी असलेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.
आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी
दरम्यान, खान कुटुंबीयांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. किरकोळ कारणावरून घडलेल्या या हिंसक घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या अशा घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी कडक भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच, व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या आधारे तपासाला गती देण्यात येत असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात मोठा गोंधळ उडाला आहे. सध्या परिसरात तणावाचे वातावरण असून सोसायटीतील नागरिक घाबरले आहेत. पोलिसांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याते आवाहन केले आहे.
हे ही वाचा :
