मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित घटना मुंबईच्या बोरिवली पश्चिम परिसरातील एलआयसी कॉलनी येथील शांती आश्रम बस डेपोजवळ घडली. इथे स्कूटरवरून आलेल्या एका तरुणाने आणि तरुणीने बीएमडब्ल्यू कारसोबत स्टंट करण्याचा प्रयत्न केला. पण स्कूटीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकीस्वार मुलगा आणि मुलगी यांचा अपघात झाला. दोघंही गंभीर जखमी झाले.
स्टंटबाजी करणाऱ्या तरुण आणि तरुणीच्या अंगावर अनेक ठिकाणी ओरखडलं असून डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. दोघांना जखमी अवस्थेत जवळच्या करुणा रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर बीएमडब्ल्यू कार रस्ता सोडून एलआयसी कॉलनीच्या हद्दीत घुसली आहे. या अपघातात स्कूटी आणि बीएमडब्ल्यू कारचं मोठं नुकसान झालं आहे. स्कूटी आणि कारचा समोरील भाग तुटला आहे.
advertisement
या घटनेची माहिती मिळताच एमएचबी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. हा अपघात नेमका कसा घडला? कुणाची चूक होती, याचा तपास पोलीस करत आहेत.