खरं तर बहुजन विकास आघाडीत नाराज असलेले माजी महापौर राजीव पाटील बविआच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी मैदानात सक्रिय झाले होते. पण अचानक राजीव पाटील हे प्रभाग क्रमांक 16 मधून भाजपकडून
निवडणूक लढवणाऱ्या निलेश चौधरी यांच्या भेटीला गेले होते. या भेटी दरम्यान त्यांनी कोणत्याही परिस्थितीत गावडे उलटा झाला पाहिजे, असे उद्गार काढले.त्यांचे हे उद्गार पाहून त्यांनी एकप्रकारे निलेश चौधरी यांना पाठींबा दर्शवला.या पाठींब्याचा फरक निकालावर पडला असून प्रभाग क्रमांक 16 मधून निलेश चौधरी विजयी झाले आहे. निलेश चौधरी यांनी बविआच्या शेखर भोईर यांचा पराभव केला आहे.
advertisement
वसई- विरारच्या महानगरपालिका निवडणुकीतील 115 विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
या प्रभागातला संपूर्ण निकाल हा राजीव पाटील यांच्या भाजप उमेदवाराच्या प्रचारानंतर फिरला आहे. त्यामुळे राजीव पाटील यांनी हितेंद्र ठाकूर यांचा गेम केल्याची चर्चा आता वसई विरारमध्ये रंगली आहे.
दरम्यान या निकालानंतर बहुजन विकास आघाडीतून भाजपमध्ये प्रवेश केलेले निलेश चौधरी विजयी झाले असून बहुजनचे नेते राजीव पाटील यांनी धनंजयला पाडा असे आवाहन केले होते.त्यामुळेच माझा विजय झाल्याचे निलेश चौधरी यांनी न्यूज 18 मराठीशी बोलताना सांगितले आहे.त्यामुळे भाजपमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
