नेमकं काय म्हणाले विक्रांत जाधव?
'मी प्रसार माध्यमांना विनंती करतो की, कुठल्यातरी पत्राचा आधार घेऊन निराधार बातम्या देऊ नका. चुकीच्या बातम्या येतात तेव्हा आम्हालाही त्रास होतो, कुटुंबाला त्रास होतो. आम्ही कुठेही जाणार नाहीत. भास्कर जाधव यांच्याबद्दल माध्यमात ज्या बातम्या सुरू आहेत, त्या सर्व निराधार आहेत. केवळ पत्राचा आधार घेऊ चुकीच्या बातम्या चालवल्या जात आहेत. भास्कर जाधव उध्दव साहेबांची साथ सोडणार नाहीत,' असं विक्रात जाधव यांनी म्हटलं आहे. दरम्यान विक्रांत जाधव यांचं भाषण सुरू असताना भास्कर जाधव चांगलेच भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.
advertisement
दरम्यान भास्कर जाधव हे शिवसेना उद्धव ठाकरे गटावर नाराज असल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर त्यांना शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांनी खुली ऑफर दिली आहे. ‘भास्कर जाधव यांची जर तिकडे घुसमट होत असेल, तर त्यांनी शिवसेनेत यावे, त्यांचा योग्य तो सन्मान केला जाईल. त्यांना एकनाथ शिंदे न्याय देतील’ असं भरत गोगावले यांनी म्हटलं आहे.