लोकलचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा
हे काम 20 डिसेंबर 2025 पासून सुरू झाले असून 18 जानेवारीपर्यंत चालणार आहे. या कालावधीत पश्चिम रेल्वेवरील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. लोकल सेवेसोबतच काही लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आले आहेत. काही गाड्या उशिराने धावणार असून काहींचे मार्ग बदलण्यात आले आहेत.
'या' मार्गावर ब्लॉक, 'या' वेळेत काही लोकल फेऱ्या रद्द
advertisement
पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार आणि शनिवारी बोरिवली ते मालाड दरम्यान अप जलद मार्गावर रात्री 11.15 ते पहाटे 3.15 वाजेपर्यंत ब्लॉक असेल. तसेच डाऊन जलद मार्गावर मध्यरात्री 1 ते पहाटे 4.30 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात पाचवा मार्ग बंद राहणार आहे. तसेच कामाच्या ठिकाणी वेगमर्यादा लागू करण्यात येणार असल्याने काही लोकल सेवा रद्द करण्यात येत आहेत. यामध्ये 12 आणि 15 डब्यांच्या लोकल तसेच वातानुकूलित लोकलचाही समावेश आहे.
लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी स्वतंत्र मार्गिका
पश्चिम रेल्वे मार्गावर प्रवाशांची संख्या सातत्याने वाढत आहे. भविष्यात लोकल फेऱ्या वाढवण्याच्या दृष्टीने वांद्रे टर्मिनस ते बोरिवली दरम्यान लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांसाठी स्वतंत्र मार्गिका तयार केली जात आहे. यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांना स्वतंत्र मार्ग मिळेल आणि इतर मार्गिकांवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे.
