नेमका कसा प्रोजेक्ट कसा असेल?
जवाहरलाल नेहरू पोर्ट आणि डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांनी विकसित केलेली नवीन मालवाहतूक मार्गिका येत्या एप्रिलपासून संपूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे. या नवीन मार्गिकेमुळे जेएनपीए पोर्टवरून देशभर विशेष म्हणजे दादरीसह उत्तर प्रदेशात जलद आणि सुरक्षित मालवाहतूक करता येईल.
अनेक गाड्यांवर होणारा परिणाम
सध्या पश्चिम रेल्वेवरील मालगाड्या प्रवासी गाड्यांसह एकाच मार्गावर धावत आहेत. रोज सुमारे 50 ते 55 मालगाड्या या मार्गावरून जात असल्याने लोकल आणि मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होत होता. मात्र आता नव्या मार्गिकेमुळे वसई रोड-कोपर विभागातील प्रवासाचा ताण कमी होईल ज्यामुळे लोकल तसेच लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी अतिरिक्त क्षमता उपलब्ध होईल.
advertisement
रेल्वे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते एक मालगाडी साधारण दौड एक्स्प्रेस गाडीइतकी लांब असते. त्यामुळे प्रवासी मार्गावरून हटवल्याने संपूर्ण पश्चिम रेल्वे नेटवर्कवरील वाहतुकीचा भार कमी होईल.
नवीन टर्मिनस उभारणार
याशिवाय पश्चिम रेल्वेवर मुंबई सेंट्रल, वांद्रे आणि जोगेश्वरीसारख्या ठिकाणी नवीन टर्मिनस उभारण्याचे काम सुरू आहे तसेच पाचवी आणि सहावी मार्गिकेचेही काम सुरु आहे. ही कामे पूर्ण झाल्यावर अधिक लोकल आणि एक्स्प्रेस गाड्या सुरू करता येतील.
