मुंबईत लोकल गाड्यांमध्ये दररोज 50 हजार ज्येष्ठ नागरिक प्रवास करतात. ज्येष्ठ नागरिकांना समर्पित डब्यांची मागणी करणारी जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर ज्येष्ठ नागरिकांना लोकलच्या लगेच डब्यातून प्रवासाची परवानगी द्यावी, असे निर्देश न्यायालयाने रेल्वेला दिले होते. यावर रेल्वे प्रशासनाने स्वतंत्र डब्याचीच व्यवस्था करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
advertisement
कामासाठी निविदा
सध्या पश्चिम रेल्वेच्या लोकलध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी 14 जागा राखीव आहेत. चर्चगेट टोकापासून तिसऱ्या आणि 12 व्या कोचमध्ये या जागा राखीव आहेत. परंतु, गर्दीच्या काळात तिथंपर्यंत पोहोचणं कठीण होतं. त्यामुळे रेल्वेने सामानाच्या डब्याला ज्येष्ठ नागरिकांसाठी समर्पित डबा करण्यास मान्यता दिली आहे. यामध्ये स्वतंत्र प्रवेश आणि निर्गमन पॉईंट असणार आहेत. एका वर्षात टप्प्याटप्याने ही सुविधा सर्व 105 गाड्यांत सुरू केली जाणार असून याच्या निवदाही जारी करण्यात आल्या आहेत.