हा डब्बा ओळखायचा कसा?
पश्चिम रेल्वेच्या 105 नॉन-एसी लोकल गाड्यांमध्ये हा बदल टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चर्चगेट स्थानकाच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये सहाव्या क्रमांकावर हा विशेष डबा असेल. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना डबा ओळखणे सोपे होणार आहे.
डब्ब्यांची रचना कशी असेल?
या खास डब्याची रचना प्रवाशांच्या सुरक्षिततेचा आणि सोयीचा विचार करून करण्यात आली आहे. डब्यात तीन 3-सीटर बेंच आणि दोन 2-सीटर युनिट्स बसवण्यात आले आहेत. त्यामुळे एकूण बसण्याची क्षमता 13 प्रवाशांची आहे. त्याचबरोबर या डब्यात 50 पेक्षा अधिक प्रवासी उभे राहू शकतात अशी सुविधा उपलब्ध आहे.
advertisement
ज्येष्ठ नागरिकांना गर्दीतून दिलासा
सुरक्षिततेच्या दृष्टीने या डब्यात विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. डब्याच्या आत, दोन्ही दरवाजांच्या अंडरफ्रेमवर आपत्कालीन शिडी देण्यात आली आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांना याचा उपयोग होणार आहे.
दररोज गर्दीच्या वेळेत प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना लोकलमध्ये चढणे-उतरणे आणि सुरक्षित प्रवास करणे अनेकदा कठीण जाते. ही अडचण लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे ज्येष्ठ नागरिकांना अधिक सुरक्षित, सुलभ आणि आरामदायी प्रवास करता येणार असून रेल्वेच्या या उपक्रमाचे स्वागत होत आहे.
