आठवड्याच्या पहिल्याच दिवशी रेल्वेचा झटका
मिळालेल्या माहितीनुसार रविवारी रात्री कांदिवली ते बोरिवलीदरम्यान अप जलद मार्गावर रात्री 11.15 ते मध्यरात्री 3.15 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्याचवेळी डाउन जलद मार्गावर मध्यरात्री 1 ते पहाटे 4.30 वाजेपर्यंत ब्लॉक राहणार आहे. हा ब्लॉक कांदिवली स्थानकातील पॉइंट आणि सिग्नलिंगशी संबंधित महत्त्वाच्या कामांसाठी घेण्यात येणार असल्याचे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.
advertisement
सविस्तर वेळापत्रक पाहा
याशिवाय सोमवारी म्हणजेच 12 जानेवारी रोजी कांदिवली ते मालाडदरम्यानही अशाच स्वरूपाचा रात्रीचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. अप जलद मार्गावर रात्री 11.15 ते मध्यरात्री 3.15 आणि डाउन जलद मार्गावर मध्यरात्री 1 ते पहाटे 4.30 दरम्यान कामे केली जाणार आहेत. या संपूर्ण कालावधीत 12 डब्यांच्या लोकल, 15 डब्यांच्या लोकल तसेच एसी लोकल सेवाही रद्द राहणार आहेत.
