मुंबई सेंट्रल टर्मिनसवरून आणखी एक 16 डब्ब्यांच्या ऐवजी 20 डब्ब्यांची वंदे भारत एक्सप्रेस चालवण्याची तयारी सुरू आहे. तर, आणखी एक 20 डब्ब्यांची वंदे भारत एक्सप्रेस चालवण्यासाठी फलाटाची रुंदी जास्त नसल्यामुळे कर्णावती एक्सप्रेस आता बांद्रा रेल्वे स्थानकावरून चालवली जाणार आहे. मुंबई सेंट्रल टर्मिनसवरून सुटणाऱ्या दोन एक्सप्रेस आता बांद्रा टर्मिनसवरून धावणार आहेत, फलाटाची रुंदी जास्त नसल्यामुळे पश्चिम रेल्वेने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. गोल्डन टेम्पलसारख्या दोन एक्सप्रेस बांद्रा स्थानकावरून धावणार आहेत.
advertisement
रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई सेंट्रल स्थानकावर प्लॅटफॉर्म्स उपलब्ध नसल्यामुळे अनेक एक्स्प्रेस बांद्रा स्थानकावरुन चालवल्या जाण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या मुंबई सेंट्रल स्थानकावरून दोन वंदे भारत एक्सप्रेस चालवल्या जात आहेत. त्यातील एक वंदे भारत एक्सप्रेस 16 डब्ब्यावरून 20 डब्ब्यांनी चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर, दुसरी वंदे भारत 20 डब्ब्यांनी चालवण्यासाठी प्लॅटफॉर्मची रुंदी नाहीये. प्लॅटफॉर्म क्र. 5 वरून पूर्वी 16 डब्ब्यांची वंदे भारत एक्सप्रेस चालवली जात होती, परंतू त्या प्लॅटफॉर्मच्या रुंदीकरणाचे काम सुरू असल्यामुळे, तिथून एकही रेल्वे सोडली जात नाहीये.
अनेक रेल्वे इतर रेल्वे स्थानकांवरून चालवल्या जाणार असल्यामुळे स्टॉल चालकांचा व्यवसाय कमी झाला आहे. मुंबई सेंट्रलहून वांद्रे टर्मिनसला गाड्या हलवल्यामुळे प्रवाशांना आणि स्टॉल चालकांनाही अडचणी येत आहेत. पश्चिम एक्सप्रेस आणि गोल्डन टेम्पल सारख्या एक्सप्रेस हलवल्यामुळे स्टॉल चालकांच्या व्यवसायावर परिणाम होत आहे. एका स्टॉल चालकाने दिलेल्या माहितीनुसार, "आम्ही निविदा सादर करताना, आम्ही स्टेशनवरून सुटणाऱ्या एक्सप्रेसच्या संख्येनुसार कोटेशन देतो. रेल्वे गाड्या हलवत आहे, ज्यामुळे आमच्या कमाईवर परिणाम होत आहे."
