लोकलने प्रवास करणाऱ्यांनी लक्ष द्या
शनिवारी रात्रीपासून सुरू होणारा हा ब्लॉक सलग 30 दिवसांचा असणार असून या दिवसात रेल्वे पायाभूत सुविधांचे महत्त्वाचे काम केले जाणार आहे. कांदिवली ते बोरिवली दरम्यान रूळ बदलणे, विविध ठिकाणी क्रॉसओव्हर बसवणे आणि काढणे तसेच सिग्नलिंग, अभियांत्रिकी आणि ओव्हरहेड उपकरणांशी संबंधित कामे हाती घेण्यात येणार आहेत.
advertisement
कसे असे वेळापत्रक?
या ब्लॉक कालावधीत पश्चिम रेल्वेवरील पाचवा मार्ग पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे उर्वरित मार्गांवर गाड्यांचा वेग मर्यादित ठेवण्यात येणार असून याचा थेट परिणाम लोकल, प्रवासी तसेच मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर होणार आहे.
पाचव्या मार्गावरून धावणाऱ्या सर्व मेल,एक्स्प्रेस आणि लोकल गाड्या अंधेरी किंवा गोरेगाव ते बोरिवलीदरम्यान जलद मार्गावरून वळवण्यात येणार आहेत. परिणामी काही लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द तर काही गाड्यांच्या वेळांमध्ये बदल करण्यात येणार आहेत. प्रवाशांनी प्रवासापूर्वी सुधारित वेळापत्रक तपासावे असे आवाहन पश्चिम रेल्वे प्रशासनाने केले आहे.
