महाविकास आघाडी सरकार असताना 2021 मध्ये पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यात आत्महत्या केली होती. या तरुणीला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप करत चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करावी, अशी मागणी करत कोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. पण, कोर्टाने ही याचिका निकाली काढण्याच्या मुद्यावर वाघ यांच्या वकिलांना फटकारलं. 'ही याचिका निकाला का काढावी, वाघ यांची मागणी आहे का, ते स्पष्ट करा' असं मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी वाघ यांच्या वकिलांना बजावलं. या मुद्यावर चित्रा वाघ यांनी X सोशल मीडिया ट्वीट करून खुलासा केला आहे.
advertisement
(MNS Beed : बीडमध्ये मनसेला धक्का! राज ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वीच अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर)
मंत्री संजय राठोड प्रकरणी माध्यमांमध्ये विविध बातम्या येत आहेत. सद्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे त्यामुळे त्यावर बाहेर टिप्पणी करणे योग्य ठरणार नाहे. मनासारखा निकाल आला की लोकशाही जिंकली आणि निकाल विपरीत गेला की, न्यायालयावर दोषारोप करणाऱ्यांना न्यायालयीन प्रक्रिया समजावून सांगणे तसंही कठीण आहे, असं वाघ म्हणाल्या.
(Ajit Pawar : माझी लाडकी बहीण योजना किती दिवस चालणार? अजित पवारांनी एकदाचं सांगूनच टाकलं)
'पण, एक बाब याठिकाणी स्पष्ट करू इच्छिते की, मी हे प्रकरण मागे घेण्याच्या कुठल्याही सुचना माझ्या वकिलांना दिलेल्या नाहीत. न्यायालयाने एखादी मौखिक टिप्पणी केली याचा अर्थ तो त्या प्रकरणाचा अंतिम निकाल नाही. न्यायालयात हे प्रकरण सध्या सुरू आहे आणि तेथे मेरिटवरच निर्णय होईल, हा माझा ठाम विश्वास आहे' असा खुलासाही वाघ यांनी केला.
