TRENDING:

Mumbai : मुलाने पैसे उचलले, पण भोगावं आईला लागलं, मुंबईत 63 वर्षांच्या महिलेसोबत भयानक घडलं!

Last Updated:

मुलाने पैसे उचलल्याची शिक्षा आईला भोगावी लागली आहे. मुंबईमध्ये 63 वर्षांच्या वृद्ध महिलेसोबत भयानक घडलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मुलाने घेतलेले 80 लाख रुपये परत न केल्यामुळे सावकारांनी त्याच्या आईचं अपहरण केल्याची संतापजनक घटना मुंबईच्या जुहू भागात घडली आहे. दोन सावकारांनी मुलाच्या 63 वर्षीय आईचं अपहरण केलं आणि कर्जाची कबुली देणाऱ्या कागदपत्रांवर सही केल्यानंतरच तिला सोडून दिलं आहे. महिन्याभरापूर्वी घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी सोमवारी एकाला अटक केली आहे, तर त्याच्या दुसऱ्या साथीदाराचा शोध सुरू आहे.
मुलाने पैसे उचलले, पण भोगावं आईला लागलं, मुंबईत 63 वर्षांच्या महिलेसोबत भयानक घडलं! (AI Image)
मुलाने पैसे उचलले, पण भोगावं आईला लागलं, मुंबईत 63 वर्षांच्या महिलेसोबत भयानक घडलं! (AI Image)
advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार पिनाकिनी भन्साळी यांनी आरोप केला आहे की, त्यांचा मुलगा मोनिलने जफर कुरेशी आणि इतर व्यक्तींकडून 30 टक्के व्याजाने मोठ्या प्रमाणात कर्ज घेतलं होतं. यासाठी त्याने 3 कोटी रुपयांचे दागिने गहाण ठेवले. 80 लाख रुपये परत करुनही कुरेशीकडून धमक्या सुरूच होत्या.

गुन्हे शाखेच्या युनिट 10 ने कुरेशीचा सहकारी अल्फाज फिरोज कासम याला अपहरण, बेकायदेशीर सावकारी, खंडणी आणि गुन्हेगारी धमकी रॅकेटच्या आरोपाखाली अटक केली आहे. तर कुरेशी हा फरार झाला आहे. गेल्या महिन्यात कुरेशी आणि त्याच्या दोन सहकाऱ्यांनी सांताक्रूझ पश्चिम येथे जबरदस्तीने महिलेला कारमध्ये बसवले आणि एका निर्जन ठिकाणी नेले. तिथे तिला धमकावून 80 लाख रुपयांच्या देण्याची कबुली देण्यासाठी स्टॅम्प पेपरवर जबरदस्तीने सही द्यायला आणि अंगठ्याचा ठसा द्यायला भाग पाडलं गेलं. मागणी मान्य केली नाही आणि रक्कम परत दिली नाही तर मुलाचा जीव धोक्यात येईल, अशी धमकी कुरेशीने महिलेला दिल्याचा आरोप आहे.

advertisement

आरोपीने कागदपत्रांवर स्वाक्षरी करतानाचा तिचा व्हिडिओ देखील शूट केला. जर तिने हे कोणाला सांगितले तर गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकीही त्याने तिला दिली आणि नंतर तिला जाऊ दिले. त्यानंतर त्याने तिला धमक्या देण्यास सुरुवात केली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

घाबरलेल्या महिलेने घडलेला प्रकार तिच्या पतीला सांगितला, यानंतर पतीने महिलेला एफआयआर दाखल करायला सांगितले. यानंतर पोलिसांनी कुरेशीची झडती घेतली, तेव्हा त्यांना अनेकांसोबत केलेले कर्ज करार, वाहन विक्री करार आणि संबंधित कागदपत्रे जप्त केली आहेत. तसंच ज्या मोबाईलमध्ये जबरदस्तीने सही घेतल्याचा व्हिडिओ आहे, तो मोबाईलही पोलिसांनी जप्त केला आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Tata चा धमाका, आता Wagon R विकून टाका! CNG मिनी SUV आणली!
सर्व पहा

कुरेशी हा परवान्याशिवाय बेकायदेशीर सावकारी व्यवसाय चालवत होता. तसंच जास्त व्याजदराने पैसे उधार देत होता. तसंच साथीदारांच्या मदतीने धमक्या आणि जबरदस्तीने थकबाकी वसून करत होता, असं गुन्हे शाखेकडून सांगण्यात आलं आहे. कुरेशीने अशाच प्रकारे अनेकांना लक्ष्य केल्याचा पोलिसांना संशय आहे.

मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai : मुलाने पैसे उचलले, पण भोगावं आईला लागलं, मुंबईत 63 वर्षांच्या महिलेसोबत भयानक घडलं!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल