उमरखेडमध्ये भाजप आमदार नामदेव सासाने आणि भाजप समन्वयक नितीन भुतडा यांनी मंगळवारी ३ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात गोपाळकाला उत्सावानिमित्ताने दहीहंडी महोत्सव आयोजित केला होता. या दहीहंडी महोत्सवात महाराष्ट्राची प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील हिचे नृत्य हे प्रमुख आकर्षण होते. आमदार महोदयांनीच गौतमीबरोबर नृत्य करायला सुरुवात केल्याने उपस्थितांना देखील स्फुरण चढले.
advertisement
कोण सुक्काळीचा चाललाय ह्यो...! शरद पवारांची फटकेबाजी, उपस्थित हसून लोटपोट
उमरखेड येथे भीषण पूरस्थिती असताना आमदार महोदयांनी जनतेच्या हितासाठी शासन प्रशासनाची मदत घेण्याऐवजी ते गौतमीसोबत नाचण्यात गुंग असल्याने सर्वसामान्य नागरिक नाराजी व्यक्त करीत होते. गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात यावर्षी ओला दुष्काळ सदृश स्थिती आहे. अनेक गावात अद्यापही पूर परिस्थिती आहे. अशा काळात सत्ताधारी भाजपचे आमदार गौतमी सोबत नाचत असल्याने जिल्ह्यात त्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.
भाजपचे आमदार म्हणजे 'एक ना धड भाराभर चिंध्या' : विजय वडेट्टीवार
यवतमाळ जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतीचे सर्वाधिक नुकसान झाले. अशी भयानक स्थिती जिल्ह्यात असताना अडचणीत असलेल्या लोकांना वाऱ्यावर सोडून भाजपचे आमदार संदीप धुर्वे हे गौतमी पाटील यांच्यासोबत बेभान नाचण्यात व्यस्त आहे.
झोपी गेलेले मुख्यमंत्री, श्रेय लाटण्यात व्यस्त असलेले दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करणे सोडून भाजपचे आमदार संदीप धुर्वे हे काय करताय? जनाची नाही तर कमीत कमी मनाची लाज ठेवून तरी संकटसमयी लोकांच्या - शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जायला हवे होते.
आडात नाही तर पोहऱ्यात कोठून येणार? महायुती सरकार जितकं असंवेदनशील तितकेच त्यातील आमदार उथळ आहे. भाजप आणि शिंदे गटातील आमदारांना सत्तेच्या पैश्यातून आलेली ही मस्ती आणि हा बेभानपणा दोन महिन्यात जनता नक्की उतरवणार आहे.
