या पुस्तक स्टॉलवर व. पु. काळे, पु. ल. देशपांडे, वि. स. खांडेकर, शं. ना. नवरे, नागनाथ कोत्तापल्ले, मंगला गोडबोले यांच्यासारख्या साहित्य दिग्गजांची लोकप्रिय पुस्तके उपलब्ध आहेत. त्याचबरोबर ययाती, प्रतिपचंद्र, बहिर्जी, युगंधर, रावण, छावा, झुंजारराव, श्रीमान योगी यांसारख्या गाजलेल्या कादंबऱ्यांचीही येथे रेलचेल आहे.
advertisement
सर्वांत महत्त्वाचं म्हणजे या सर्व पुस्तके पूर्णपणे नवीन स्वरूपात आहेत, जुन्या किंवा वापरलेल्या नाहीत. तरीही दर अत्यंत किफायतशीर ठेवण्यात आला आहे. 500 रुपयांपर्यंतच्या मूळ किमतीची पुस्तके फक्त 250 रुपयांमध्ये तर काही खास निवडक पुस्तके फक्त 150 रुपयांत उपलब्ध आहेत.
शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्णसंधी ठरू शकते. अभ्यासाव्यतिरिक्त वाचन करण्याची सवय लावण्यासाठी आणि चांगल्या साहित्याशी संपर्क साधण्यासाठी अशी संधी फारच मोलाची ठरते.
या स्टॉलवरील पुस्तकांची मांडणी आकर्षक असून, साहित्यप्रकारांनुसार केलेली वर्गवारी वाचकांना हवे ते पुस्तक सहज सापडण्यास मदत करते. कथा, कादंबऱ्या, आत्मचरित्र, प्रेरणादायक पुस्तके, ऐतिहासिक साहित्य आणि काल्पनिक कथा अशा विविध प्रकारांमध्ये भरपूर पर्याय येथे उपलब्ध आहेत. मुंबईच्या गडबडीत थोडा वेळ बाजूला काढून, या पुस्तक स्टॉलला भेट दिल्यास साहित्याच्या अमूल्य खजिन्याचा आनंद घेता येईल.