मिळालेल्या माहितीनुसार, 6 डिसेंबरला दीपयान आणि त्याचे काही मित्र अंधेरीतील क्रिकेट स्पर्धा खेळून रात्री उशिरा घरी परतले. सर्व जण दीपयानच्या फ्लॅटवर जमले तिथे त्यांनी जेवण करून फुटबॉल सामना पाहिला. त्यानंतर दीपयानने पहाटे सूर्योदय पाहण्यासाठी वर्सोवा बीचवर जाण्याचे ठरवले आणि मित्रांनाही सोबत येण्याचे सांगितले.
सूर्योदय पाहायला निघाला आणि काळानेच गाठलं
रात्री ठरल्याप्रमाणे सर्व पहाटे दुचाकीवरुन बीचकडे निघाले. अनुरागच्या दुचाकीवर दीपयान मागे बसला होता, तर इतर मित्र वेगवेगळ्या वाहनांवर होते. मात्र वर्सोवा मेट्रो स्टेशनखालील बॉम्ब बॉन लेनजवळ अचानक अनुरागची दुचाकी वेगात असल्याने त्याला रस्त्यावरील स्पीडब्रेकरचा अंदाज आला नाही. दुचाकी हवेत उडाल्याने त्याचे नियंत्रण सुटलं आणि रस्त्यावर जोरात आपटली.
advertisement
या धक्क्यात मागे बसलेला दीपयान थेट रस्त्यावर कोसळला. तो बेशुद्ध झाल्याचे पाहून सर्व मित्रांनी त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांतपासणीदरम्यान दीपयानला मृत घोषित केले. घडलेल्या या अपघाताने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मात्र वर्सोवा पोलिसांनी दुचाकी चालक अनुराग कारलिया याच्याविरोधात निष्काळजीपणे वाहन चालविल्याचा गुन्हा नोंदवला आहे.
