मिळालेल्या माहितीनुसार, बिजापूर आणि दंतेवाडा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या गंगलूरच्या जंगलात आज सकाळपासून सुरक्षा दलाने अभियान राबवलं आहे. जवानांनी माओवाद्यांना घेरल्यानंतर चकमक सुरू झाली. दुपारी या चकमकीमध्ये पाच माओवादी ठार झाले असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर दुसरीकडे माओवाद्यांच्या प्रती हल्ल्यात दोन जवान शहीद झाले आहेत, अजूनही चकमक सुरूच आहे. घटनास्थळी सुरक्षा दलाची अतिरिक्त जवान दाखल झाले आहे.
advertisement
ही चकमक बिजापूर-दंतेवाडा सीमेवरील घनदाट जंगलात झाली. सुरक्षा दलाच्या टीमने या परिसरात कोम्बिंग ऑपरेशन सुरू केलं होतं. त्याच दरम्यान सकाळी ९ वाजता चकमक सुरू झाली आणि काही तासांपर्यंत अधूनमधून गोळीबार सुरू राहिला. या चकमकीत आतापर्यंत १२ माओवादी ठार झाले आहेत. सुरक्षा दलांनी घटनास्थळावरून एसएलआर रायफल, ३०३ रायफल, इतर शस्त्रं आणि मोठ्या प्रमाणात दारूगोळा जप्त केला आहे. ही जप्ती टीमसाठी एक मोठं यश मानलं जात आहे. कारण ही शस्त्रे माओवाद्यांनी अनेक मोठ्या हल्ल्यांमध्ये वापरली आहेत. ही कारवाई डीआरजी (दंतेवाडा-बिजापूर), एसटीएफ, कोब्रा आणि सीआरपीएफच्या संयुक्त टीमने केली.
दुर्दैवाने, या चकमकीत तीन सुरक्षा जवान शहीद झाले, तर एक जखमी झाला. जखमी जवानांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं वृत्त आहे. शहीद हेड कॉन्स्टेबल मोनू वदारी, डीआरजी विजापूर; शहीद कॉन्स्टेबल डुकारू गोंडे, डीआरजी विजापूर आणि शहीद सैनिक रमेश सोडी, डीआरजी विजापूर अशी तिन्ही जवानांची नावं आहे. सुरक्षा दलांनी शहीदांचे मृतदेह ताब्यात घेतले आहे आणि त्यांना पूर्ण सन्मानाने जिल्हा मुख्यालयात पाठवलं आहे.
