TRENDING:

पत्नी आंघोळीला गेली, पतीने केले धक्कादायक कृत्य; ISROमधील निवृत्त कर्मचाऱ्याच्या भयानक प्रकाराने पोलीसही गोंधळले

Last Updated:

Bengaluru News: बेंगळुरूमध्ये इस्रोच्या एका 75 वर्षीय निवृत्त कर्मचाऱ्याने आपल्या पत्नीची टॉवेलने गळा आवळून निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बेंगळुरू: कर्नाटकची राजधानी बेंगळुरूतील अवलाहळ्ळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी सकाळी घडलेल्या धक्कादायक घटनेत इस्रोचे निवृत्त कर्मचारी नागेश्वर राव (वय 75) यांनी आपल्या पत्नीची गळा आवळून हत्या केल्याचा आरोप आहे.
News18
News18
advertisement

पोलिसांच्या माहितीनुसार सकाळी सुमारे 10 वाजता त्यांची पत्नी संध्याश्री (वय 65) आंघोळीला गेली असताना राव यांनी टॉवेलने तिचा गळा आवळला. हे ज्येष्ठ दाम्पत्य मागील तीन वर्षांपासून त्या अपार्टमेंटमध्ये राहत होते. ही धक्कादायक घटना व्हाइटफिल्ड परिसरातील बोम्मनहळ्ळी भागातील ‘व्हर्चुओसो’ या अपार्टमेंट संकुलात घडली.

घटना घडल्यानंतर राव यांनी आपल्या काही मित्रांना फोन करून प्रकाराबद्दल माहिती दिल्याचे सांगितले जाते. पत्नीची हत्या केल्यानंतर स्वतःचे जीवन संपवण्याचाही त्यांचा कथित विचार होता, अशी प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. घटनेच्या वेळी दाम्पत्याची मुलगी घरी नव्हती.

advertisement

चौकशीदरम्यान आरोपीने विसंगत विधाने केल्याचेही समोर आले आहे. एका टप्प्यावर त्यांनी असा दावा केला की, पत्नीनेच टॉवेलने त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याला प्रतिउत्तर म्हणून त्यांनी तिची हत्या केली. मात्र या दाव्याची सत्यता तपासली जात आहे.

प्राथमिक तपासात नागेश्वर राव अलीकडच्या काळात मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांचा सामना करत असल्याचे संकेत मिळाले आहेत. संयुक्त पोलीस आयुक्त रमेश बानोत यांनी सांगितले की, ही घटना अवलाहळ्ळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. नागेश्वर राव इस्रोमध्ये टीम लीडर म्हणून कार्यरत होते आणि निवृत्तीनंतर पत्नीसमवेत येथे राहत होते. संध्याश्री यांचा मृतदेह घरात आढळून आला असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
...तर खरी शिवजयंती साजरी होईल, शिव व्याख्याते बांगर यांचं परखड भाष्य, Video
सर्व पहा

अवलाहळ्ळी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून घटनेमागील नेमके कारण आणि आरोपीचे दावे यांची सखोल चौकशी केली जात आहे.

मराठी बातम्या/देश/
पत्नी आंघोळीला गेली, पतीने केले धक्कादायक कृत्य; ISROमधील निवृत्त कर्मचाऱ्याच्या भयानक प्रकाराने पोलीसही गोंधळले
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल