TRENDING:

Air India Plane Crash : टेक-ऑफपूर्वी विमान 'फिट', तरीही 50 सेकंदांत अपघात कसा झाला? समोर आली नवी माहिती

Last Updated:

Air India Plane Crash : अपघाताशी निगडीत वेगवेगळी माहिती आता समोर येऊ लागली आहे. विमान उड्डाणापूर्वी योग्य स्थितीत असल्याची माहिती समोर आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अहमदाबाद: अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या भीषण अपघातानंतर देशभरात शोक व्यक्त करण्यात येत आहे. तर, दुसरीकडे या अपघात प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. अपघाताशी निगडीत वेगवेगळी माहिती आता समोर येऊ लागली आहे. विमान उड्डाणापूर्वी योग्य स्थितीत असल्याची माहिती समोर आली आहे.
Ahmedabad Air India Plane Crash
Ahmedabad Air India Plane Crash
advertisement

एका वृत्तसंकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, विमान उड्डाणापूर्वी पूर्णपणे ठीक स्थितीत होते. त्याच वेळी, विमानाची तपासणी करणारा फ्लाइट इंजिनिअर एअर इंडियाचाच होता. त्यानेच विमानाची संपूर्ण तांत्रिक तपासणी केली. त्यानंतर, फ्लाइट इंजिनिअरने विमानाच्या उड्डाणाच्या योग्य स्थितीत असल्याच्या रिपोर्टवर स्वाक्षरी केली. यासोबतच, या अपघातग्रस्त विमानाच्या मुख्य पायलटची देखील स्वाक्षरी करण्यात आली. त्यावेळी विमान ठीक होते, परंतु उड्डाणानंतर अवघ्या 50 सेकंदात ते कोसळले. त्यामुळे विमान अपघात प्रकरणातील गांभीर्य वाढले आहे.

advertisement

ड्रीमलाइनर्सबाबत घेतला मोठा निर्णय?

एअर इंडियाच्या ताफ्यात सध्या 34 ड्रीमलाइनर्स आहेत. एअर इंडियाकडे आधीच यापैकी 27 होत्या आणि विस्ताराच्या विलीनीकरणानंतर, त्यांच्या ताफ्यात समाविष्ट 7 ड्रीमलाइनर्स देखील एअर इंडियाच्या ताफ्यात सामील झाले. सध्या, देशातील सर्व विमान कंपन्यांच्या तुलनेत एअर इंडियाकडे सर्वाधिक ड्रीमलाइनर विमाने आहेत. सूत्रांनी सांगितले की अहमदाबादमध्ये झालेल्या अपघातानंतर, आता त्या सर्वांची तपासणी केली जाईल. त्यानंतरच त्यांना उड्डाण करण्याची परवानगी दिली जाणार आहे.

advertisement

अहमदाबाद ते लंडन या विमानाच्या उड्डाणापूर्वी, इंधन क्षमता, दोन्ही इंजिन, फ्लॅप्स, कॉकपिट, एसी, वीज आणि इतर अनेक गोष्टी तपासण्यात आल्या. विमानाच्या तपासणीत सर्व काही बरोबर असल्याचे आढळून आले. त्यानंतरच विमानाला उड्डाणाची परवानगी देण्यात आली. कोणत्याही उड्डाणापूर्वी, प्रत्येक उड्डाणाची अशा प्रकारे तपासणी केली जात असल्याचे एका फ्लाइट इंजिनिअरने सांगितले.

कोणत्या बाबींची झाली होती तपासणी?

advertisement

अहमदाबाद ते लंडन या विमानाच्या उड्डाणापूर्वी, इंधन क्षमता, दोन्ही इंजिन, फ्लॅप्स, कॉकपिट, एसी, वीज आणि इतर अनेक गोष्टी तपासण्यात आल्या. तपासणीत सर्व काही बरोबर असल्याचे आढळून आले. त्यानंतरच विमानाला उड्डाणाची परवानगी देण्यात आली. कोणत्याही उड्डाणापूर्वी, उड्डाण अभियंते प्रत्येक उड्डाणाची अशा प्रकारे तपासणी करतात. जर काही तांत्रिक बिघाड असेल अथवा शंका जरी असेल तरी विमानाचे उड्डाण रद्द केले जाते. विमानात सगळं व्यवस्थित होते तर अपघात झाला कसा, याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

advertisement

DGCA करणार पायलट्सच्या कुटुंबाशी चर्चा...

कोणत्याही विमानाच्या उड्डाणापूर्वी, त्याचे वैमानिक आणि क्रू यांची ब्रेथ एनालायझर चाचणी केली जाते. अहमदाबाद विमान अपघातात दोन्ही पायलट ठार झाल्याने आता डीजीसीए कडून त्यांच्या कुटुंबाशी चर्चा करण्यात येणार आहे. पायलट कोणत्या तणावात होते का, त्यांची मानसिक स्थिती कशी होती, याची माहिती घेतली जाणार आहे. त्याशिवाय, एअर इंडियातील इतर सहकाऱ्यांकडेदेखील त्यांच्या वर्तवणुकीची चर्चा करण्यात येणार आहे.

इतर संबंधित बातमी:

Air India Plance Crash : शेवटपर्यंत प्रयत्न करणाऱ्या पायलटला ऐन वेळी दगा, अपघाताचं हे ठरणार का कारण? समोर आली महत्त्वाची माहिती

मराठी बातम्या/देश/
Air India Plane Crash : टेक-ऑफपूर्वी विमान 'फिट', तरीही 50 सेकंदांत अपघात कसा झाला? समोर आली नवी माहिती
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल