मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव वेगाने येणारी ऑडी कार प्रथम डिव्हायडरला धडकली आणि नंतर नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या अनेक गाड्यांना कारने उडवलं. अपघातानंतर कार सुमारे ३० मीटरपर्यंत घसरत गेली. यावेळी समोर येणाऱ्या गाड्या आणि स्टॉल्सना कारने उडवलं. अपघातावेळी कारमध्ये तीन जण होते. यातील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हे सर्वजण जयपूरचे रहिवासी असल्याचं निष्पन्न झालं आहे. या कारचं पासिंग दमण आणि दीव येथील आहे.
advertisement
अपघाताबद्दल माहिती देताना काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की, हा अपघात इतका भीषण होता की कारने १२ हून अधिक गाड्या आणि स्टॉल्स धडक दिली. यावेळी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका कारही ऑडीने उडवलं. यात ही कार जाग्यावर उलटली. या भीषण अपघातात १६ जण जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच मुहाना आणि पत्रकार कॉलनी पोलीस ठाण्यातील पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सर्व जखमींना तातडीने रुग्णवाहिकेने रुग्णालयात नेले. बारा जखमींवर सध्या एसएमएस आणि जयपुरिया रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर इतर चार जण प्राथमिक उपचार घेतल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांसह घरी परतले आहेत.
मुहाना पोलीस स्टेशनचे एसएचओ गुरु भूपेंद्र सिंह यांनी सांगितले की, प्राथमिक तपासात असे दिसून येते की ऑडी कार वेगाने जात होती. चालक मद्यधुंद असल्याचा संशय आहे. अपघातानंतर पोलिसांनी ऑडी कार जप्त केली आहे आणि प्रकरणाचा तपास करत आहे. प्रत्यक्षदर्शींच्या मते, जर अपघातावेळी काही लोक वेळीच पळून गेले नसते तर अपघात आणखी भीषण ठरला असता.
