TRENDING:

'भारताने तेथे हल्ला केला होता, स्पष्ट पुरावे आहेत'; नव्या 'वॉर मॅन्युअल'ने पाकिस्तान हादरले, एव्हिएशन विश्लेषक टॉम कूपर यांचा दावा

Last Updated:

India Struck Pakistan Kirana Hills: एव्हिएशन विश्लेषक टॉम कूपर यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान भारताने पाकिस्तानच्या किराना हिल्स अणुसंबंधित सुविधेवर प्रहार केल्याचा खळबळजनक दावा केला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली: भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान पाकिस्तानच्या किराणा हिल्स येथील अणुसुविधेवर हल्ला झाल्याचा दावा एव्हिएशन इतिहासकार आणि विश्लेषक टॉम कूपर यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी NDTV ला दिलेल्या मुलाखतीत, उपलब्ध पुरावे स्पष्ट आणि निर्विवाद असल्याचे सांगितले. मात्र भारतीय वायुदलाने (IAF) अशा कारवाईचे अधिकृतपणे खंडन केले आहे.
News18
News18
advertisement

“हा हल्ला केवळ संदेशासाठी होता”

कूपर यांच्या मते, हल्ल्याची वेळ आणि स्वरूप पाहता तो थेट विध्वंसासाठी नव्हता, तर धोरणात्मक इशारा देण्यासाठी होता. “अशा ठिकाणी तुम्ही तेव्हाच प्रहार करता, जेव्हा स्पष्ट संदेश द्यायचा असतो. मोठ्या प्रमाणावर नुकसान न करता, ‘आम्ही हवे तेव्हा, हवे तिथे आणि हवे तेवढे प्रहार करू शकतो’ हा इशारा देण्यासाठी,” असे ते म्हणाले.

advertisement

संरक्षण यंत्रणेवर टीका

ऑपरेशन सिंदूरदरम्यानच कूपर यांनी फेसबुक पोस्टद्वारे भारताच्या संरक्षण जनसंपर्क यंत्रणेवरही टीका केली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार, किराणा हिल्सजवळील कथित हल्ल्याबाबत वायुदलाने स्पष्ट भूमिका घेतली नाही.

एअर मार्शल नागेश कपूर यांनी पत्रकार परिषदेत या संदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना, “अशा प्रकारच्या कारवाईबाबत आम्हाला माहिती नाही,” असे म्हटल्याचे कूपर यांनी नमूद केले. त्यावर टीका करताना कूपर यांनी म्हटले की, उपलब्ध व्हिडिओ आणि इतर माहितींकडे दुर्लक्ष केले जात आहे.

advertisement

‘राजनैतिक हालचालींमधून चित्र स्पष्ट’

कूपर यांनी पुढे असा युक्तिवाद केला की, हल्ल्यानंतर झालेल्या राजनैतिक घडामोडींवरूनही परिस्थिती स्पष्ट होते. त्यांच्या मते, इस्लामाबादने वॉशिंग्टन आणि नवी दिल्लीशी संपर्क साधत युद्धविरामासाठी हालचाली सुरू केल्या. “घडामोडींची साखळी पाहिली, तर चित्र अधिक स्पष्ट होते,” असे ते म्हणाले.

कोणते आहेत कथित पुरावे?

advertisement

कूपर यांच्या मते, काही व्हिडिओंमध्ये क्षेपणास्त्रांचे धुरकट मागोवे (contrails) किराणा हिल्सकडे उतरताना दिसतात. तसेच, पाकिस्तान वायुदलाच्या 4091व्या स्क्वॉड्रनच्या रडार स्टेशनमधून धूर निघत असल्याचे दृश्य त्यांनी पुरावा म्हणून नमूद केले.

त्यांच्या दाव्यानुसार, भारतीय वायुदलाने प्रथम रडार स्टेशन निष्क्रिय केले, जेणेकरून प्रतिहल्ल्याची क्षमता कमी होईल. त्यानंतर भूमिगत शस्त्रसाठा सुविधांच्या किमान दोन प्रवेशद्वारांवर प्रहार करण्यात आला. किराणा हिल्स हे पाकिस्तानच्या अणुकार्यक्रमातील महत्त्वाचे केंद्र मानले जाते. येथे 20 ते 24 ‘नॉन-क्रिटिकल’ अणुपरीक्षणे झाल्याचा दावा त्यांनी केला.

advertisement

पाकिस्तानचा प्रतिहल्ला अपयशी?

कूपर यांच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानने ‘ऑपरेशन बुनयान-उन-मरसूस’च्या माध्यमातून प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. मात्र भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेमुळे तो मोठ्या प्रमाणावर निष्फळ ठरला, असा त्यांचा दावा आहे.

“निर्णायक क्षण” असा दावा

कूपर यांनी या कथित हल्ल्याला संघर्षातील निर्णायक टप्पा संबोधले. त्यांच्या मते, या घटनेमुळेच संपूर्ण संघर्षात भारताचे पारडे जड ठरले.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
रासायनिक काजळामुळे डोळ्यांना धोका? वेळीच घ्या अशी काळजी, सोप्या टिप्सचा Video
सर्व पहा

दरम्यान, भारतीय अधिकाऱ्यांकडून या दाव्यांवर कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. त्यामुळे कूपर यांच्या विधानांकडे सध्या स्वतंत्र विश्लेषकाचे मत म्हणूनच पाहिले जात आहे.

मराठी बातम्या/देश/
'भारताने तेथे हल्ला केला होता, स्पष्ट पुरावे आहेत'; नव्या 'वॉर मॅन्युअल'ने पाकिस्तान हादरले, एव्हिएशन विश्लेषक टॉम कूपर यांचा दावा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल