TRENDING:

'जीवनगौरव' पुरस्कार विजेता योग शिक्षक अटकेत, 17 वर्षीय विद्यार्थिनीचा धक्कादायक आरोप, पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

Last Updated:

Yoga Teacher: बेंगळूरूमधील एका योग शिक्षकाला अल्पवयीन विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. प्लेसमेंट आणि परदेशवारीचे आमिष दाखवून आरोपीने हे कृत्य केले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
News18
News18
advertisement

बेंगळूरू: बेंगळूरूमधील एका ५५ वर्षीय योग शिक्षकाला १७ वर्षीय विद्यार्थिनीचा वारंवार लैंगिक छळ केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. प्लेसमेंट आणि परदेशवारीचे आमिष दाखवून आरोपीने हा गुन्हा केल्याचे पोलिसांनी सांगितले.

'द हिंदू' वृत्तपत्रानुसार एम. निरंजना मूर्ती असे या आरोपीचे नाव असून, तो आर.आर. नगर येथील 'सनशाईन द योगा झोन' (Sunshine The Yoga Zone) या संस्थेचा संस्थापक आणि संचालक आहे.

advertisement

पीडित मुलीने केलेल्या तक्रारीच्या आधारे मूर्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६९ (फसवणुकीने लैंगिक संबंध ठेवणे) आणि ७५ (२) (लैंगिक छळ) तसेच लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण (POCSO) कायदा, २०१२ च्या कलम १२ (लैंगिक छळासाठी शिक्षा) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

advertisement

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने 'डेक्कन हेराल्ड'ला सांगितले की, आरोपीला अटक करण्यात आली आहे आणि पुढील तपास सुरू आहे.

३० ऑगस्ट रोजी दाखल केलेल्या तक्रारीनुसार- पीडित मुलगी २०१९ पासून आरोपी मूर्तीला ओळखत होती. तेव्हा तो कर्नाटक योगासन स्पोर्ट्स असोसिएशन (KYSA) चा सरचिटणीस होता. २०२१ पासून ती आंतरराष्ट्रीय योग स्पर्धांमध्ये भाग घेत होती. पीडित मुलीच्या म्हणण्यानुसार, २०२३ मध्ये ती एका स्पर्धेसाठी मूर्तीसोबत थायलंडला गेली होती. तेव्हा त्याने तिचा लैंगिक छळ केला. या घटनेनंतर तिने स्पर्धांमध्ये भाग घेणे आणि योग केंद्रात जाणेही बंद केले.

advertisement

'द हिंदू'च्या वृत्तानुसार २०२२ मध्ये ती पुन्हा आरोपीच्या 'सनशाईन द योगा झोन'मध्ये दाखल झाली. तिथे ऑगस्ट २०२५ मध्ये पदक आणि प्लेसमेंटचे आमिष दाखवून मूर्तीने पुन्हा तिचा लैंगिक छळ केला. २२ ऑगस्ट रोजी राज्यस्तरीय प्लेसमेंटचे आमिष दाखवून मूर्तीने पुन्हा तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप मुलीने केला. हा त्रास असह्य झाल्याने पीडित मुलीने आपल्या कुटुंबीयांना याची माहिती दिली आणि त्यानंतर तक्रार दाखल केली.

advertisement

आरोपीने १२ वेळा राष्ट्रीय संघाचे नेतृत्व केले असून, त्याला कर्नाटक सरकारकडून 'जीवन गौरव पुरस्कारा'सह (Life Achievement Award) अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

मराठी बातम्या/देश/
'जीवनगौरव' पुरस्कार विजेता योग शिक्षक अटकेत, 17 वर्षीय विद्यार्थिनीचा धक्कादायक आरोप, पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल