का पुकारला आहे भारत बंद?
देशभरात काम करणाऱ्या 25 कोटींपेक्षा जास्त कामगारांनी 9 जुलै रोजी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या कामगारविरोधी, शेतकरीविरोधी आणि देश विरोधी कॉर्पोरेट धोरणांचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन होणार आहे.
कोण-कोण सहभागी होणार?
या बंदमध्ये देशातील 10 मोठ्या केंद्रीय कामगार संघटना सहभागी होणार आहेत. जसं की:
advertisement
INTUC, CITU, AITUC, SEWA, HMS, आणि इतर संघटना.
यामध्ये बँक कर्मचारी संघटनाही सहभागी होणार असल्याचं स्पष्ट केलं गेलंय.
बँक सेवा बंद राहणार?
हो. 9 जुलैला देशातील अनेक बँकांचे व्यवहार प्रभावित होण्याची शक्यता आहे. काही बँका बंद राहतील किंवा कामकाज मर्यादित स्वरूपात होईल. त्यामुळे त्या दिवशी बँकेचे व्यवहार टाळल्येलंच उत्तम.
शाळा, कॉलेजेस आणि ऑफिसेस?
शाळा, कॉलेजेस आणि खासगी ऑफिसेस बंद राहणार नाहीत, पण वाहतूक व्यवस्था विस्कळीत होण्याची शक्यता आहे. बस, टॅक्सी आणि कॅब सेवा प्रभावित होऊ शकतात. त्यामुळे प्रवास करताना अडचण येऊ शकते.
रेल्वे सेवा चालू राहणार?
रेल्वे सेवा बंद होणार नाही, पण काही भागात मोर्चे, रस्ते अडवण्यासारख्या आंदोलनांमुळे रेल्वे विलंब होऊ शकतो.
बंद मागचं मुख्य कारण काय?
कामगार संघटनांचं म्हणणं आहे की त्यांनी सरकारकडे आपली 17 मुद्द्यांची मागणी दिली होती, पण सरकारने अजूनही त्यावर काही ठोस पावलं उचललेली नाहीत. त्यामुळे त्यांना आता रस्त्यावर उतरावं लागतंय.