सहरसा, 14 ऑगस्ट : पावसाळ्यात विविध विषारी प्राणी मोठ्या संख्येने बिळातून बाहेर येतात. त्यामुळे अडगळीच्या ठिकाणी, अंधाऱ्या भागात सर्वांनी काळजी घ्यावी, असं कायमच सांगितलं जातं. रस्त्यात साचलेल्या पावसाच्या पाण्यात किंवा चिखलातदेखील विषारी जीवजंतू असण्याची शक्यता असते. मात्र आपण त्यांच्यापासून वाचण्यासाठी पूर्ण काळजी घेऊ पण प्रशासनच आपली काळजी घेत नसेल तर? असा प्रश्न तुम्हालाही पडेल ही बातमी वाचल्यानंतर.
advertisement
मागील काही वर्षांमध्ये बिहारचा अतिशय वेगाने विकास झाला. विविध योजनांतर्गत इथल्या रस्त्यांचं अगदी पक्क्या स्वरूपाचं बांधकाम करण्यात आलं. मात्र असं असलं तरी आजही इथले अनेक रस्ते चिखलांखालीच आहेत. सहरसा जिल्ह्यातल्या चोरनिया गावातले लोक याबाबत प्रचंड हाल सहन करत आहेत. एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना तब्बल सहा महिने लागतात, असं गंमतीत म्हटलं जातं. मात्र लोक असं का बोलतात पाहूया.
ड्रायव्हरच्या लेकाला 2 कोटींची स्कॉलरशीप; सरकारी शाळेत शिकला, आता UK मध्ये घेणार PhD
चोरनियाचे गावकरी आजही सोयी-सुविधांपासून जणू कोसो दूर आहेत. त्यांना घराबाहेर पाऊल ठेवायचं म्हटलं की, तब्बल 3 ते 5 फूट चिखलाने भरलेल्या रस्त्यावरून चालावं लागतं. मात्र कामानिमित्त घराबाहेर पडणं भाग असतं. मग अशा परिस्थितीत हे लोक कपडे काढून चिखलाच्या रस्त्यावरून जातात आणि पुढे हात-पाय स्वच्छ धुवून आपापल्या कामाला निघतात. पुरुष कसाबसा हा अवघड रस्ता पार करतात, परंतु स्त्रियांसमोर मात्र मोठी अडचण निर्माण होते.
प्रेमविवाहाचा दुर्दैवी अंत, पोलिसांसमोर मुलांनी वाचला बापाच्या कृत्याचा पाढा!
गावकरी तेगरनाथ यादव सांगतात, 'वर्षाचे सहा महिने रस्त्यात चिखल साठण्याची समस्या ही आता जणू गावची परंपरा झाली आहे. यामुळे गावकऱ्यांना घराबाहेर पडणं अवघड होतं, गावात येणारे पाहुणे तर आत येण्याआधीच माघारी फिरतात किंवा कपडे काढून कसेबसे गावात प्रवेश करतात.' महत्त्वाचं म्हणजे तेगरनाथ यांच्या घराजवळ तीन फुटांपर्यंत चिखल साचतं. जरा पुढे गेल्यावर पाच फुटांपर्यंत चिखल असतं. 'लोक या जीवघेण्या चिखलात पाय ठेवायलाही घाबरतात, मात्र प्रशासन लक्ष देत नाही', अशी खंत त्यांनी व्यक्त केली.