TRENDING:

बिहारमध्ये पुन्हा 'नितीश'राज, कोणत्याच सर्व्हेत तेजस्वी सरकार नाही, सगळे एक्झिट पोल एकाच ठिकाणी!

Last Updated:

Bihar Vidhan Sabha Assembly Exit Poll: तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महागठबंधन सत्तेच्या जवळही जात नसल्याचा अंदाज महत्त्वाच्या मतदानोत्तर चाचण्यांमधून व्यक्त होत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या बिहार विधानसभेचे दुसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदान संपले असून मतदानोत्तर चाचण्यांचे आकडे समोर आले आहेत. प्रमुख मतदानोत्तर चाचण्यांच्या आकड्यांमध्ये बिहारमध्ये पुन्हा एकदा नितीश कुमार यांचे सरकार येण्याचा अंदाज आहे. महत्त्वाची बाब म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या जागा गत निवडणूक निकालाच्या तुलनेत यंदा घटू शकतात मात्र सर्वांत जास्त जागा मिळवणारा पक्ष सलग दुसऱ्या वेळीही भाजपच असण्याची शक्यता आहे. तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महागठबंधन सत्तेच्या जवळही जात नसल्याचा अंदाज महत्त्वाच्या मतदानोत्तर चाचण्यांमधून व्यक्त होत आहे.
नितीश कुमार आणि तेजस्वी यादव
नितीश कुमार आणि तेजस्वी यादव
advertisement

कोणत्या संस्थांनी कुणाला किती जागा दिल्या?

स्रोत (Source) एनडीए (NDA) एमजीव्ही (MGB) जेएसपी (JSP) इतर (OTH)
चाणक्य स्ट्रॅटेजीज (Chanakya Strategies) १३०-१३८ १००-१०८ ०-० ३-५
हिंदी वृत्तपत्र १४५-१६० ७३-९१ ०-३ ५-७
डीव्ही रिसर्च (DV Research) १३७-१५२ ८३-९८ २-४ १-८
जेव्हीसी (JVC) १३५-१५० ८८-१०३ ०-१ ३-६
मॅट्रिझ (Matrize) १४७-१६७ ७०-९० ०-२ २-८
पी-मार्क (P-Marq) १४२-१६२ ८०-९८ १-४ ०-३
पीपल्स इनसाईट (People's Insight) १३३-१४८ ८७-१०२ ०-२ ३-६
पीपल्स पल्स (Peoples Pulse) १३३-१५९ ७५-१०१ ०-५ २-८

advertisement

 न्यूज १८ (News 18) १४०-१५० ८५-९५ ०-५ ५-१०

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुण्यातील खरटमल कुटुंबाचा अनोखा छंद, जुन्या ग्रामोफोनचा केला संग्रह,काय आहे खास?
सर्व पहा

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी गुरुवारी १२१ मतदारसंघांमध्ये मतदान झाले तर मंगळवारी दुसऱ्या टप्प्यात १२२ जागांसाठी मतदान पार पडले. एकूण २४३ जागांसाठी मतदान संपन्न झाले असून १२२ हा बहुमताचा आकडा आहे. बिहारमध्ये मुख्य लढत जेडीयूचे सर्वेसर्वा मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आरजेडीचे तेजस्वी यादव यांच्यामध्येच आहे. महागठबंधन विरुद्ध एनडीए यांच्यामध्ये होत असलेल्या लढतीकडे देशाचे लक्ष लागले आहे.

advertisement

मराठी बातम्या/देश/
बिहारमध्ये पुन्हा 'नितीश'राज, कोणत्याच सर्व्हेत तेजस्वी सरकार नाही, सगळे एक्झिट पोल एकाच ठिकाणी!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल