या घटनेमुळे प्रवाशांमध्ये पुन्हा गोंधळाचं आणि भीतीचं वातावरण आहे. प्रवाशांनी डब्यातून खाली उड्या टाकल्या आहेत. समोरासमोर दोन मालगाडी आल्या. त्यामागून एक्सप्रेस आली. गाड्यांना योग्य तो सिग्नल मिळाला नव्हता का असा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. बेजबाबदारपण पुन्हा एकदा समोर आला आहे.
बिलासपूरमध्ये एकाच रेल्वे ट्रॅकवर तीन गाड्या आल्याने प्रवाशांमध्ये पुन्हा एकदा अपघाताचे भीती निर्माण झाली. कोटमीसोनार आणि जयरामनगर स्टेशनच्या दरम्यान ही धक्कादायक घटना घडली, ज्यामुळे रेल्वे प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
advertisement
एकाच ट्रॅकवर मालगाड्या आणि पॅसेंजर ट्रेन
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या बिलासपूर झोनमधील कोटमीसोनार आणि जयरामनगर या दोन लहान स्टेशनदरम्यान हा प्रकार घडला. एक प्रवासी ट्रेन (पॅसेंजर ट्रेन) आपल्या मार्गाने जात असताना, अचानक तिच्या पुढ्यात आणि मागच्या बाजूला दोन मालगाड्या उभ्या दिसल्या. याचा अर्थ, ही प्रवासी ट्रेन दोन मालगाड्यांच्या मध्ये एकाच ट्रॅकवर अडकली होती. ड्रायव्हर किंवा गार्डकडून सिग्नलची चूक झाल्यामुळे ही गंभीर स्थिती निर्माण झाली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. एकाच ट्रॅकवर तीन गाड्या असणे अत्यंत धोकादायक असून, किरकोळ चूकही मोठ्या दुर्घटनेस कारणीभूत ठरू शकली असती.
प्रवाशांमध्ये भीती, अनेकांनी पटरीवर टाकल्या उड्या
जवळपास उभ्या असलेल्या मालगाड्या पाहून प्रवासी ट्रेनमधील प्रवाशांमध्ये मोठा गोंधळ आणि भीतीचे वातावरण पसरले. नुकत्याच झालेल्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली. 'आता काय होणार?' या भीतीने अनेकजण ओरडू लागले, तर काही लोक प्रार्थना करू लागले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अनेक प्रवाशांनी तातडीने ट्रेनमधून खाली उडी मारण्याचा निर्णय घेतला. लहान मुले आणि महिला जास्त घाबरलेल्या होत्या. अनेक प्रवासी आपले सामान घेऊन धावले, तर काहीजण जीवाची पर्वा करत सामानाशिवायच पटरीवर उतरले. सुदैवाने, चालकाने वेळेवर ट्रेन थांबवल्यामुळे कोणताही मोठा अपघात टळला.
