भाजपचा जोरदार पलटवार
भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी राहुल गांधींवर टीका करताना म्हटले की, "राहुल गांधींना ना संविधानाची समज आहे ना कायद्याची." ते पुढे म्हणाले की, 'पंतप्रधान मोदी यांचे विजय खोटे आहेत, असे राहुल गांधी सतत म्हणतात, हा देशाच्या मतदारांचा अपमान आहे.' राहुल गांधींनी 'हायड्रोजन बॉम्ब' फोडणार असल्याचे म्हटले होते, पण तो 'फुसका' ठरला, अशी उपहासात्मक टीका त्यांनी केली.
advertisement
दिल्लीतील भाजप नेते मंजिंदर सिंग सिरसा यांनीही राहुल गांधींना लक्ष्य केले. "हा कसला बॉम्ब? 'हायड्रोजन बॉम्ब' म्हणत होते, आता म्हणतात फुसका ठरला," असे म्हणत त्यांनी गांधींच्या आरोपांची खिल्ली उडवली.
केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनीही राहुल गांधींचे आरोप 'हास्यास्पद' असल्याचे म्हटले. . त्यांनी आठवण करून दिली की कर्नाटकच्या मालूर मतदारसंघातील काँग्रेसचा विजय हायकोर्टाने रद्द केला आहे. 'ऑनलाइन मतदार हटवले गेले' हा दावा पूर्णपणे चुकीचा आहे, असेही ते म्हणाले.
महाराष्ट्राचे मंत्री व शिवसेना नेते योगेश कदम यांनीही राहुल गांधींवर टीका केली. ते म्हणाले, "पराभव पचवत नसल्यामुळे ते खोटे आरोप करत आहेत. बिहार निवडणुकीतही त्यांना लोक नाकारतील." दरम्यान, काँग्रेस पक्षाने राहुल गांधींच्या आरोपांचे समर्थन केले आहे. काँग्रेस खासदार तारिक अन्वर यांनी, 'राहुल गांधींनी पुराव्यांसह आरोप केले आहेत. काहीतरी अनियमितता झाली हे स्पष्ट आहे,' असे म्हटले. काँग्रेसचे म्हणणे आहे की, हे आरोप केवळ निराधार नाहीत, तर ते पुराव्यावर आधारित आहेत.
या आरोपांवरून भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार राजकीय वादंग सुरू झाला आहे. दोन्ही पक्ष आपापल्या भूमिकेवर ठाम असून, या वादाने भारतीय राजकारणात एक नवीन अध्याय सुरू झाला आहे.