TRENDING:

ब्लॅक बॉक्सचा रंग काळा नसतो मग त्याला 'Black Box' का म्हणतात? मग त्याचा खरा रंग कोणता?

Last Updated:

'ब्लॅक बॉक्स' हा शब्द पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. विमान अपघात असो किंवा एखादी मोठी तांत्रिक दुर्घटना, तज्ज्ञ सर्वात आधी 'ब्लॅक बॉक्स' शोधतात. पण तुम्हाला माहित आहे का? नावाप्रमाणे हा बॉक्स 'काळा' (Black) नसतो.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला, ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. पण त्यांच्यासोबत घडलेली ही घटना अपघात नव्हती तर तो घातपात होता असा आरोप केला जात आहे. पण याचं उत्तर विमानाचं ब्लॅक बॉक्सच देऊ शकतो असं अनेकांना बोलताना तुम्ही टीव्हीवर ऐकलं असेल, पण हा ब्लॅक बॉक्स म्हणजे नक्की काय? त्याचा रंग काळा असतो का? तो अशी काय माहिती देईल असे असंख्य प्रश्न लोकांच्या मनात उपस्थीत झाले आहेत. त्यामुळेच आता 'ब्लॅक बॉक्स' हा शब्द पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. विमान अपघात असो किंवा एखादी मोठी तांत्रिक दुर्घटना, तज्ज्ञ सर्वात आधी 'ब्लॅक बॉक्स' शोधतात. पण तुम्हाला माहित आहे का? नावाप्रमाणे हा बॉक्स 'काळा' (Black) नसतो.
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
advertisement

हो, तुम्ही बरोबर वाचलंय. विमानाचा हा अत्यंत महत्त्वाचा भाग काळ्या रंगाचा नसून चटकदार नारिंगी (Bright Orange) रंगाचा असतो. मग त्याला 'ब्लॅक बॉक्स' का म्हणतात? चला यामागचं कारण समजून घेऊ.

विमानाचा अपघात झाल्यास, ढिगाऱ्यात किंवा जंगलात हा बॉक्स सहज दिसावा, म्हणून त्याला गडद नारिंगी रंग दिला जातो. या रंगाला 'इंटरनॅशनल ऑरेंज' असंही म्हणतात. जर हा काळा असता, तर रात्रीच्या वेळी किंवा जळालेल्या अवशेषांमध्ये तो शोधणं अशक्य झालं असतं.

advertisement

मग 'ब्लॅक बॉक्स' हे नाव कसं पडलं?

या नावामागे तीन प्रमुख कारणं सांगितली जातात:

1. इतिहास: दुसऱ्या महायुद्धाच्या काळात विमानातील अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे बॉक्स काळ्या रंगाचे असायचे. त्यावरून हे नाव रूढ झालं असावं.

2. गोपनीयता: या बॉक्समध्ये रेकॉर्ड होणारी माहिती अत्यंत गोपनीय असते, म्हणून त्याला 'ब्लॅक' (अनाकलनीय किंवा गुप्त) म्हटलं जातं.

advertisement

3. आगीमुळे झालेला रंग: पूर्वीच्या काळी अपघातात आग लागल्यामुळे हा बॉक्स काळवंडलेला मिळायचा, त्यामुळे लोक त्याला ब्लॅक बॉक्स म्हणू लागले.

नक्की असतो तरी काय हा 'ब्लॅक बॉक्स'?

तांत्रिक भाषेत याला 'फ्लाईट डेटा रेकॉर्डर' (FDR) आणि 'कॉकपिट व्हाईस रेकॉर्डर' (CVR) असं म्हणतात.

यामधील FDR: विमानाचा वेग, उंची आणि इंधनाची माहिती साठवतो.

advertisement

तर CVR: पायलटमधील संवाद आणि कॉकपिटमधील आवाज रेकॉर्ड करतो.

हा बॉक्स कधीच खराब का होत नाही?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
एकाच शेतात घ्या वेगवेगळी पिकं, सोपी पद्धत अन् उत्पन्नातही वाढ, असा हा फॉर्म्युला
सर्व पहा

अजित पवारांच्या विमानासारख्या घटनांमध्ये जेव्हा चौकशी होते, तेव्हा हाच बॉक्स माहितीचा खरा स्रोत ठरतो. हा बॉक्स स्टेनलेस स्टील किंवा टायटॅनियमपासून बनवलेला असतो. तो भीषण आग, पाण्याचा प्रचंड दाब आणि कोणत्याही मोठ्या धक्क्यापासून सुरक्षित राहतो. समुद्रात पडला तरी तो कित्येक दिवस सिग्नल पाठवू शकतो.

advertisement

मराठी बातम्या/देश/
ब्लॅक बॉक्सचा रंग काळा नसतो मग त्याला 'Black Box' का म्हणतात? मग त्याचा खरा रंग कोणता?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल